Thursday, June 13, 2024

कधीकाळी नाना पाटेकरांसोबतच्या प्रेम प्रकरणामुळे चर्चेत आलेली अभिनेत्री आयशा जुल्का, सध्या करते ‘हे’ काम

हिंदी सिने जगतात अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्या सध्या सिने जगतात फारशा दिसत नसल्या तरी त्यांच्या अभिनयाची आणि दमदार भूमिकांची आजही चाहत्यांमध्ये चर्चा रंगलेली पाहायला मिळते. यामध्ये अभिनेत्री आएशा जुल्काच्या (Ayesha Jhulka) नावाची नेहमीच चर्चा होताना दिसत असते. 90 च्या दशकात आपल्या अभिनयाने आणि घायाळ करणाऱ्या सौंदर्याने या अभिनेत्रीने सर्वांनाच मोहित केले होते. जाणून घेऊया तिच्या या फिल्मी प्रवासाबद्दल.

वयाच्या 11 व्या वर्षी मुंबईत स्वप्नांच्या शहरात आलेल्या आयशाला 1983 मध्ये एका चित्रपटात बालकलाकार म्हणून काम मिळाले. या चित्रपटानंतर तिने अनेक छोट्या-छोट्या भूमिका करून आपल्या अभिनयाला वळण देण्याचे काम केले. दुसरीकडे तिने स्वत:साठी प्लॅन बीही तयार केला होता. आयशा फॅशन डिझायनिंगचेही शिक्षण घेत होती. अशा परिस्थितीत जर ती अभिनेत्री बनू शकली नाही तर फॅशन डिझायनर बनण्याचा विचार तिने केला होता. फॅशन डिझायनिंगचे शिक्षण घेत असतानाच आयशाला सलमान खानच्या कुर्बान चित्रपटात कामाची ऑफर आली.

या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आणि आयशा झुलकाच्या कारकिर्दीला एक नवीन दिशा मिळवून दिली.  यानंतर अभिनेत्रीला नरसिंह या चित्रपटात डिंपल कपाडिया आणि सनी देओलसोबत काम करण्याची संधी मिळाली. हा चित्रपट मिळाल्याने आयशा खूप खूश होती. पण तिचा हा आनंद फार काळ टिकला नाही आणि अखेरच्या क्षणी उर्मिलाच्या हातात हा चित्रपट पडला. याबाबत अभिनेत्रीने एका मुलाखतीत दुःखही व्यक्त केले आहे. यानंतर आयशाला खिलाडी आणि जो जीता वही सिकंदर सारखे चित्रपट मिळाले. आमिर खानसोबतचा तिचा जो जीता वही सिकंदर हा चित्रपट आयशाच्या फिल्मी करिअरचा टर्निंग पॉइंट ठरला.

या चित्रपटामुळे ती रातोरात लोकांमध्ये लोकप्रिय झाली. पण कदाचित तुम्हाला माहित नसेल की या चित्रपटादरम्यान आयेशाच्या डोक्यात एक खिळा घुसला होता. ही जखम इतकी खोल होती की डॉक्टरांनी तिला दोन-तीन दिवस शूट करु नका असे सांगितले. पण एकदा चित्रपटाचे शूटिंग आधीच बंद पडल्यानंतर आयशाला चित्रपट गमवायचा नव्हता. अशा परिस्थितीतही अभिनेत्रीने या  चित्रपटात काम केले. या चित्रपटात अनेक दृश्यांमध्ये अभिनेत्री लाल टोपीमध्ये दिसली होती. ही  जखम झाकण्यासाठीही ही टोपी घातली होती.

दरम्यान अभिनेत्री आएशा जुल्का तिच्या अभिनयाप्रमाणेच प्रेमप्रकरणामुळेही प्रचंड चर्चेत आली होती. अभिनेते नाना पाटेकरांसोबतचे प्रेमप्रकरण चांगलेच गाजले होते. दोघे लिव्हइन मध्ये राहत असल्याच्याही बातम्या त्या काळात रंगल्या होत्या. परंतु त्यांचे हे नाते फार काळ टिकू शकले नाही. त्यानंतर अभिनेत्रीने उद्योजक समीर वाशीसोबत विवाह केला. आजही ती सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते.(jo jeeta wohi sikandar fame ayesha jhulka was once in the headlines for her relationship with nana patekar)

अधिक वाचा- 
हुमा कुरेशीला ‘गँग्स ऑफ वासेपूर’साठी मिळाले केवळ ‘इतके’ पैसे, जाणून तुम्हालाही वाटेल आश्चर्य
बापाला आणखी काय हवं? मराठी अभिनेत्याची लेक झाली पायलट पोस्ट शेअर करत व्यक्त केला आनंद

हे देखील वाचा