Saturday, July 6, 2024

गांधीजींच्या अंत्यसंस्काराच्या शूटिंगमध्ये सहभागी झाले तब्बल ४ लाख लोक, पाहून बेन किंग्सलेही झाले होते चकित

आज २ ऑक्टोबर, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती. महात्मा गांधी यांचे भारतीय स्वातंत्र्यलढ्यात मोलाचं योगदान आहे. त्यांनीच जगाला सत्य व अहिंसेचा संदेश दिला. सत्याग्रह आणि शांततेच्या मार्गाने आंदोलन करून, त्यांनी इंग्रजांना पळवून लावले. म्हणूनच महात्मा गांधी हे संपूर्ण जगात महान क्रांतिकारी म्हणून ओळखले जातात.

महात्मा गांधी यांच्या जीवनावर आधारित अनेक चित्रपट आजपर्यंत प्रदर्शित झाले आहेत. त्यामधील १९८२ मध्ये प्रदर्शित झालेला ‘गांधी’ हा चित्रपट प्रचंड गाजला. यामध्ये गांधीजींची भुमिका साकारणारे ब्रिटिश अभिनेते बेन किंग्सले यांनी या चित्रपटाबद्दल अशी माहिती सांगितली, ज्यामुळे महात्मा गांधी हे किती महान क्रांतिकारी होते हे दिसून येते. (mahatma gandhi jayanti 2021 actor ben kingsley recalled funeral scene from film)

अनेक ब्रिटिश आणि भारतीय कलाकारांचा समावेश असलेला ‘गांधी’ हा चित्रपट १९८२ मध्ये प्रदर्शित झाला, ज्यामध्ये बेन किंग्सले यांनी मुख्य भुमिका म्हणजेच, महात्मा गांधीजींची भुमिका साकारली होती. “या भुमिकेमुळेच मला जगभर प्रसिद्धी मिळाली”, असं बेन सांगतात. तसंच ही भुमिका साकारण्याची संधी मिळाली, याबद्दल ते स्वतःला भाग्यवान समजतात.

बेन किंग्सले यांनी २०१९ मध्ये दिलेल्या एका मुलाखतीमध्ये या चित्रपटाबद्दल अनेक रंजक गोष्टी सांगितल्या. यावेळी बोलताना बेन किंग्सले यांनी या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यानचा एक किस्सा सांगितला, जो ऐकुन सगळेच थक्क झाले. बेन किंग्सले म्हणाले की, “ज्यावेळी या चित्रपटात महात्मा गांधी यांच्या अंत्ययात्रेचा भाग चित्रित होत होता, त्यात सहभागी होण्यासाठी तब्बल ४ लाख लोक तेथे जमले होते आणि ही सगळ्यात असामान्य गोष्ट होती.” या बद्दल पुढे बोलताना बेन किंग्सले म्हणतात की, “गांधीजी पडद्यावर साकारणं खूपच आव्हानात्मक होतं आणि याच चित्रपटामुळे मला जगात ओळख मिळाली.”

या चित्रपटात रोहिणी हट्टंगडी, ओम पुरी, अमरीश पुरीसह अनेक परदेशी कलाकारांचाही समावेश होता. अनेक मानाचे पुरस्कारही या चित्रपटाला मिळाले होते.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-बॉलिवूडमध्ये तयार झाले गांधीजींच्या विचारांचं दर्शन घडविणारे चित्रपट, एकावर तर पाकिस्तानने घातली होती बंदी

-‘मला खुश राहायचंय’, म्हणत घराच्या छतावर पावसाळी वातावरणाचा आनंद लुटताना दिसली ‘स्वीटू’

-लग्नाच्या पहिल्या रात्रीच अक्षय कुमारला समजलं होतं पत्नी ट्विंकलचं ‘हे’ सत्य, अभिनेत्याने सर्वांसमोर केला खुलासा

हे देखील वाचा