Saturday, July 27, 2024

लहान असल्यापासूनच महेश बाबू आहे स्टार, वडिलांच्या ‘या’ अटीमुळे 9 वर्ष सोडली होती इंडस्ट्री

दाक्षिणात्य चित्रपटांतील सर्वात यशस्वी अभिनेत्यांपैकी एक महेश बाबू (mahesh babu) त्याच्या अभिनायाने सगळ्यांच्या मनावर राज्य केले आहे. त्याची प्रत्येक भूमिका खूप गाजली आहे. अशातच मंगळवारी (9 ऑगस्ट) रोजी आपला वाढदिवस साजरा करत आहे. टॉलिवूडचा प्रिन्स म्हणून प्रसिद्ध असलेल्या महेश बाबूने वयाच्या चौथ्या वर्षी नीदा या चित्रपटाद्वारे बालकलाकार म्हणून पदार्पण केले. महेश बाबूचे वडील घटामनेनी शिव रामा कृष्णा हे तेलगू चित्रपटांचे खूप मोठे अभिनेते होते. आज महेश बाबू यांची गणना साऊथमधील सर्वाधिक मानधन घेतलेल्या अभिनेत्यांमध्ये केली जाते. डोकुडू, पोकिरी, भारत अने नेनू, सरकार वारी पाता यांसारख्या अनेक ब्लॉकबस्टर सिनेमांमध्ये त्यांनी काम केले आहे.

महेश बाबूने (Mahesh Babu) वडिलांच्या चित्रपटातून पदार्पण केले. महेश वडिलांसोबत चित्रपटाच्या सेटवर गेला होता. येथे त्याची दखल दिग्दर्शक दासरी नारायण राव यांनी घेतली आणि चित्रपटात भूमिका दिली. यानंतर त्यांनी महेश शंखावरम, बाजार राउडी, मुग्गुरु कोडुकुलू आणि गुडाचारी यांसारख्या चित्रपटांमध्ये बालकलाकार म्हणून काम केले आहे. त्याला अनेक चित्रपटांच्या ऑफर येत होत्या पण, त्याच्या वडिलांनी त्याला अभिनय करण्याऐवजी आपले शिक्षण पूर्ण करण्यास सांगितले. यानंतर तो नऊ वर्षे चित्रपटांपासून दूर राहिला. 1999 मध्ये त्याने राजा कुमारुडू या चित्रपटातून पदार्पण केले. महेश बाबू यांना त्यांच्या पहिल्या चित्रपटासाठी दक्षिणेतील प्रसिद्ध नंदी पुरस्कार मिळाला होता.

महेश बाबूच्या कारकिर्दीत एक वाईट टप्पा आला जेव्हा त्यांचे चित्रपट एकापाठोपाठ फ्लॉप झाले. त्यानंतर त्यांनी काही काळ विश्रांती घेतली. 2005 मध्ये, त्याने ‘अनाडू’ चित्रपटाद्वारे पुनरागमन केले जे त्या वर्षातील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला. यानंतर त्याने ‘पोकिरी’ चित्रपटात काम केले. 2009 मध्ये सलमान खानचा ‘वॉन्टेड’ हा चित्रपट याच चित्रपटाचा रिमेक होता. महेश बाबूच्या एकूण संपत्तीबद्दल बोलायचे तर ते 224 कोटी रुपयांच्या मालमत्तेचे मालक आहेत. हैदराबादच्या जुबली हिल्समध्ये त्यांचा बंगला आहे. त्याची किंमत 30 कोटी रुपये आहे.

महेश बाबूच्या कार कलेक्शनबद्दल सांगायचे तर त्यांच्याकडे लॅम्बोर्गिनी गॅलार्डो आहे, ज्याची किंमत सुमारे 3  कोटी रुपये आहे. याशिवाय त्याच्या टोयोटा लँड क्रूझरची किंमत 90 लाख रुपये आहे. त्याच वेळी, त्याच्या Audi A-8 ची किंमत 1.2 कोटी आहे.

वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे झाले तर महेश बाबूने 3006 मध्ये नम्रता शिरोडकरसोबत लग्न केले. लग्नापूर्वी दोघांनी तब्बल चार वर्षे डेट केले होते. दोघेही दोन मुलांचे पालक आहेत. महेश बाबूने अलीकडेच सांगितले की, त्यांना बॉलिवूडमधून ऑफर आल्या, पण बॉलिवूड त्यांना परवडत नाही.

अधिक वाचा- 
फरहान अख्तरच्या ‘डॉन 3’ चित्रपटाचा टीझर रिलीज; शाहरुखच्या जागी दिसला ‘हा’ अभिनेता
सोनाक्षी सिन्हाचा क्लासी लूक फोटो पाहून चाहते थक्क; पाहा फोटो

हे देखील वाचा