Saturday, December 7, 2024
Home बॉलीवूड महेश बाबूचे बायसेप्स पाहून युजर्स म्हणाले, ‘दक्षिणेचा ऋतिक रोशन’, पाहा अभिनेत्याची खास पाेस्ट

महेश बाबूचे बायसेप्स पाहून युजर्स म्हणाले, ‘दक्षिणेचा ऋतिक रोशन’, पाहा अभिनेत्याची खास पाेस्ट

साऊथ सुपरस्टार महेश बाबू सध्या त्याच्या आगामी ‘SSMB 28’ तेलगू चित्रपटावर काम करत आहेत, ज्यासाठी तो सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहे. अशात त्याने एक पाेस्ट शेअर केली आहे, जी इंटरनेटवर माेठ्या प्रमाणात व्हायरल हाेत आहे. खरं तर, अभिनेत्याने जिममधील त्याचे नवीन फोटो शेअर केले आहेत, ज्यावर चाहते भिन्नभिन्न कमेंट करुन प्रेमाचा वर्षाव करत आहेत.

महेश बाबू (mahesh babu) याने त्याच्या अधिकृत इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या फाेटाेमध्ये ताे प्रचंड देखणा आणि डॅशिंग दिसत आहे. फाेटाेमध्ये अभिनेता जिम ट्रेनरसोबत दिसत असून तो एक्सरसाइज करत आहे. तर दुसर्‍या फाेटाेत, महेश बाबू त्याचे बायसेप्स फ्लॉंट करताना दिसत आहे. फाेटाेमधील अभिनेत्याच्या लूकबद्दल बोलायचे झाले, तर त्याने निळ्या रंगाचा टी-शर्ट घातली आहे आणि राखाडी रंगाच्या शॉर्ट्स सह शूज परिधान केला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Mahesh Babu (@urstrulymahesh)

हे फोटो शेअर करत महेशने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘आर्म डे.’ अभिनेत्याच्या या फाेटाेवर चाहते प्रेमाचा वर्षाव करत आहे. चाहत्यांसोबत अभिनेत्याची पत्नी नम्रता शिरोडकरनेही प्रतिक्रिया दिली आहे. नम्रताने फायर इमोजीसह अभिनेत्याच्या फाेटाेवर प्रेमाचा वर्षाव केला आहे. त्याचवेळी एका युजरने लिहिले की, “इंटरनेटवर आग लावाली.”, तर दुसऱ्या युजरने लिहिले की, ‘खूप हॉट’ अशात एका युजरने कमेंट करत लिहिले की, ‘तुम्ही बॉलिवूड डेब्यूसाठी पूर्णपणे तयार आहात असे दिसते.’, तर एक चाहता अभिनेत्याची स्थुती करत म्हणाला, ‘दक्षिणचा ऋतिक रोशन’

महेश बाबूच्या आगामी चित्रपटाबद्दल बाेलायचे झाले, तर अभिनेता सध्या ‘SSMB 28’ च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.  या चित्रपटात त्याच्यासोबत अभिनेत्री पूजा हेगडे आणि श्रीलीला दिसणार आहेत. याचे दिग्दर्शन त्रिविक्रम श्रीनिवास करत आहेत. हा चित्रपट एक फॅमिली ड्रामा असल्याचं बोललं जात आहे.(tollywood actor mahesh babu shares pics from his gym flaunting biceps users called him hrithik roshan of south industry)

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
रजनीकांत यांनी केली त्यांच्या १७० व्या चित्रपटाची घोषणा, टीजे ज्ञानवेल दिग्दर्शित सिनेमात दिसणार थलाइवा

चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान श्रद्धाबद्दल करण्यात आली नारेबाजी; चाहते म्हणाले, ’10 रुपयांची पेप्सी, श्रद्धा कपूर…’

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा