Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

सुपरस्टार महेश बाबूवर भडकले रश्मिका मंदानाचे चाहते, सोशल मीडियावर व्यक्त केला जातोय संताप

अल्लू अर्जुन (Allu Arjun) आणि रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) अभिनित ‘पुष्पा: द राइज – पार्ट १’ने केवळ प्रेक्षकांची मने जिंकली नाहीत, तर बॉक्स ऑफिसवरही जबरदस्त धमाल केली आहे. चित्रपटाने अवघ्या तीन दिवसांत २०० कोटींचा टप्पा पार केला आहे. ७ डिसेंबर २०२१ रोजी ५ भाषांमध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटातील प्रत्येक पात्राचे प्रेक्षक कौतुक करत आहेत.

केवळ प्रेक्षकच नव्हे, तर अनेक कलाकारांनी देखील या चित्रपटाचे कौतुक केले आहे. या यादीत आता टॉलिवूडचा चॉकलेट बॉय महेश बाबूचाही (Mahesh Babu) समावेश झाला आहे. पण तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की, चित्रपटाचे कौतुक केल्यानंतर अभिनेत्याला आता रश्मिका मंदानाच्या चाहत्यांच्या रोषाचा सामना करावा लागत आहे. (mahesh babu brutally trolls by rashmika mandanna fans)

महेश बाबूने अलीकडेच पुष्पा चित्रपट पाहिल्यानंतर सोशल मीडियावर त्याचे जोरदार कौतुक केले. मात्र, या ट्वीटमध्य महेश बाबू रश्मिका मंदान्नाचे कौतुक करायला विसरला. या ट्वीटमुळे रश्मिकाच्या चाहत्यांनी अभिनेत्यावर जोरदार टीका केली. शिवाय महेश बाबूने मागील चित्रपटात अभिनेत्री रश्मिका मंदान्नासोबत कामही केले होते. दुसरीकडे, केवळ अल्लू अर्जुनची स्तुती केल्यामुळे खुद्द महेश बाबूचे चाहतेही नाराज झाले आहेत.

‘पुष्पा: द राईज’चे दिग्दर्शन सुकुमार यांनी केले असून, चित्रपटाची कथा आंध्र प्रदेशातील शेषाचलम हिल्समधील लाल चंदन तस्करांच्या जीवनावर आधारित आहे. या चित्रपटाचा दुसरा भाग २०२२ मध्ये प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.

दुसरीकडे महेश बाबूबद्दल बोलायचे झाले, तर तो लवकरच ‘सरकारू वारी पाटा’ या चित्रपटात दिसणार आहे. त्याने या चित्रपटाच्या पहिल्या शेड्यूलचे शूटिंग पूर्ण केले आहे.

हेही नक्की वाचा-

हेही पाहा-

हे देखील वाचा