Thursday, April 24, 2025
Home साऊथ सिनेमा मी बॉलिवूडला परवडणार नाही म्हणणारा महेश बाबू करणार झळकणार ‘या’ हिंदी चित्रपटात, नेटकरी म्हणाले ‘आता…’

मी बॉलिवूडला परवडणार नाही म्हणणारा महेश बाबू करणार झळकणार ‘या’ हिंदी चित्रपटात, नेटकरी म्हणाले ‘आता…’

काही महिन्यांपासून सिने जगतात दाक्षिणात्य सिनेसृष्टी आणि बॉलिवूडमध्ये जोरदार वाद होताना दिसत आहे. दाक्षिणात्य सिनेमांना सध्या देशभर मिळणारा जोरदार प्रतिसाद हे या वादाचे प्रमुख कारण होते. या वादात अनेक दाक्षिणात्य कलाकारांनी बॉलिवूडवर टिका केली होती. यामध्ये अभिनेता महेश बाबूने मी कधीही बॉलिवूडमध्ये काम करणार नाही, कारण मी त्यांना परवडणार नाही असे वक्तव्य केले होते. या वक्तव्यावरुन त्याच्यावर अनेकांनी टीका केली होती. परंतु आता लवकरच अभिनेता महेश बाबू (Mahesh Babu) बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याची बातमी समोर आली आहे. 

याबाबत संपूर्ण माहिती अशी की, महेश बाबू हा दाक्षिणात्य सिनेजगतातील एक लोकप्रिय अभिनेता म्हणून ओळखला जातो. तो आपल्या दमदार अभिनयासाठी आणि एक्शनसाठी सिनेसृष्टीत विशेष प्रसिद्ध आहे. त्याचा प्रत्येक चित्रपटाची चाहत्यांना नेहमीच उत्सुकता लागलेली असते. आता महेश बाबूच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली असून लवकरच तो एस. एस. राजामौली यांनी दिग्दर्शित केलेल्या चित्रपटातून लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याची माहिती समोर आली आहे.

याबद्दलची माहिती सिनेसृष्टीतील एका व्यक्तीने दिली आहे. महेश बाबूच्या या आगामी चित्रपटाच्या निर्मितीमध्ये बाहुबली दिग्दर्शक राजामौली यांच्यासह बॉलिवूडमधीलही अनेक दिग्गज निर्मातेही सहभागी होणार आहेत. यामुळेच अभिनेता महेश बाबूचा आधीचा चित्रपट सरकारी वारु वाटा हा चित्रपट हिंदीमध्ये रिलीज करण्यात आला नव्हता.महेश बाबूच्या या चित्रपटात त्याच्यासोबत अभिनेत्री किर्ती सुरेशही झळकणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक एस.एस.राजामौली असल्याने नेहमी प्रमाणेच त्यांचा चित्रपट भव्यदिव्य आणि बिगबजेट असणार अशी चर्चा सिनेजगतात रंगली आहे.

दरम्यान, अभिनेता महेश बाबूने ‘महर्षी’, ‘मेजर’, अशा अनेक दमदार चित्रपटांमध्ये काम केले आहे. चित्रपटाच्या दमदार यशामुळेच तो दाक्षिणात्य सिनेजगतातील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्यांच्या यादीत येतो.

हेही वाचा-

गेहना वशिष्ठच्या बोल्ड फोटोवर चाहते झाले फिदा पण भयानक कॅप्शनने वाढवली चिंता; म्हणतेय, ‘मला आता खूप…’

नादचं ! जान्हवी कपूरचे सुंदर फोटो

‘त्यांच्यासोबत काम करणे विचित्र वाटेल’, खानमंडळीसोबत काम करण्याबाबत जान्हवीने केले मोठे विधान

हे देखील वाचा