‘त्यांच्यासोबत काम करणे विचित्र वाटेल’, खानमंडळीसोबत काम करण्याबाबत जान्हवीने केले मोठे विधान

जान्हवी कपूर (Janvahi Kapoor) सध्या तिच्या ‘गूडलक जेरी’ या चित्रपटामुळे चांगलीच चर्चेत आली आहे. जान्हवीच्या नुकत्याच प्रदर्शित  झालेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा जोरदार प्रतिसाद पाहायला मिळत असून तिच्या अभिनयाचे जोरदार कौतुक करण्यात येत आहे. बॉलिवूडमध्ये अल्पावधीतच लोकप्रियता मिळवणाऱ्या जान्हवीने बॉलिवूडमधील तिन्ही खानमंडळींसोबत काम करण्याबद्दल मोठे विधान केले आहे. तिच्या या विधानाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे. काय आहे हे संपूर्ण प्रकरण चला जाणून घेऊ. 

जान्हवी कपूर ही बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. आपल्या दमदार अभिनयाने आणि सोज्वळ सौंदर्याने तिने सिने जगतात स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. अलिकडेच जान्हवीने एका मुलाखतीत सिने जगताबद्दल एक विधान केले आहे ज्याची सध्या चर्चा रंगली आहे.

एका मुलाखतीदरम्यान तिला विचारण्यात आले की, तिला बॉलिवूडचे तिन्ही खान, शाहरुख खान, सलमान खान आणि आमिर खानसोबत काम करायला आवडेल का? यावर जान्हवीने मजेशीर उत्तर दिले आहे. या तिन्ही सुपरस्टार्ससोबतची तिची जोडी मोठ्या पडद्यावर विचित्र दिसेल, असे तिने सांगितले. एका वृत्तवाहिनीशी बोलताना ती म्हणाली, ‘तो सर्वात मोठा स्टार आहे आणि प्रत्येकाला त्याच्यासोबत काम करायचे आहे, पण त्याच्या विरुद्ध काम केल्यास मला थोडे विचित्र वाटेल.’ मात्र, तिघांसोबत काम करण्याची इच्छा असल्याचे तिने सांगितले.

या मुलाखतीत जान्हवीने पुढे सांगितले की “तिला कोणत्या कलाकारांसोबत जोडी बनवायची आहे. वरुण धवन, रणबीर कपूर यांसारख्या स्टार्ससोबत ती मोठ्या पडद्यावर चांगली दिसणार असल्याचे अभिनेत्रीने सांगितले. याशिवाय जान्हवीने आलिया भट्टचेही जोरदार कौतुक केले. अभिनेत्रीने सांगितले की, आलियाने तिला खूप प्रेरित केले आहे.

वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, नुकताच जान्हवीचा गुड लग जेरी हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे. याशिवाय ती ‘बवाल’ चित्रपटातही दिसणार आहे. दंगल आणि छिछोरे सारख्या ब्लॉकबस्टर्ससाठी ओळखले जाणारे नितेश तिवारी या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. याशिवाय मिस्टर अँड मिसेस माही, तख्त आणि मिली या चित्रपटातही ती तिचे अभिनय कौशल्य दाखवताना दिसणार आहे.

हेही वाचा –

अक्षय कुमारच्या ‘गोरखा’ चित्रपटाच्या स्क्रिप्टवर अजूनही काम चालूच, निर्मात्यांनी केला खुलासा

‘ती’ छोटीशी चूक पडली महागात, अभिनेता कुशल बद्रिकेला बेदम मारहाण

‘नेसली माहेरची साडी…’ खास गाण लावून अलका कुबल यांचा लंडनमध्ये सेंडऑफ, पाहा काय आहे प्रकरण

Latest Post