Saturday, January 17, 2026
Home साऊथ सिनेमा आवडता चित्रपट कोणता? ते कशाची सर्वात जास्त भिती वाटते? सुपरस्टार महेश बाबूने केले अनेक धक्कादायक खुलासे

आवडता चित्रपट कोणता? ते कशाची सर्वात जास्त भिती वाटते? सुपरस्टार महेश बाबूने केले अनेक धक्कादायक खुलासे

सरकार वारु पाता या चित्रपटाच्या यशानंतर सुपरस्टार महेश बाबूने (Mahesh Babu) एका मासिकासाठी फोटोशूट केले आहे. ज्यासाठी त्याने रॅपिड-फायर चॅलेंजमध्ये भाग घेतला आणि अनेक मनोरंजक प्रश्नांची उत्तरे दिली. यावेळी सुपरस्टार महेश बाबूने त्याला विचारलेल्या सर्व प्रकारच्या वैयक्तिक गोष्टीही सांगितल्या. ज्यामधून अनेक धक्कादायक सत्यही महेश बाबूने सांगितली आहेत. त्याची सर्वात मोठी भीती तसेच तणाव कमी करण्यासाठी तो काय करतो हे देखील त्याने आपल्या या मुलाखतीत सांगितले आहे. पाहूया या दाक्षिणात्य सुपरस्टारची झालेली ही जबरदस्त मुलाखत आणि त्याने केलेले रंजक खुलासे.

या संपूर्ण मुलाखतीत महेश बाबूला अनेक प्रश्न विचारण्यात आले. ज्याची त्याने बेधडक उत्तरे दिल्याचे पाहायला मिळत आहे. “महेश बाबूला तुम्हाला सर्वात जास्त कोणते निकनेम आवडते?” असे विचारल्यानंतर त्याने आजीने दिलेले नाव आवडत असल्याचे उत्तर दिले. ज्या नावाने ती घरी हाक मारते ते आवडते.असे उत्तर दिले. “तुला सर्वात मोठी भीती काय आहे?” असे विचारले असता तो म्हणाला की “मी माझ्या दिग्दर्शकाच्या अपेक्षा पूर्ण करू शकत नाही. एक लपलेली प्रतिभा जी तुम्ही फक्त घरी दाखवता किंवा ती फक्त अभिनेत्यांनाच माहीत असते.” याबद्दल पुढे बोलताना तो म्हणाला, मी खूप मजेदार व्यक्ती आहे आणि माझी पत्नी आणि मुलांना माझ्यातला तो पैलू पाहायला मिळतो.”

जेव्हा महेश बाबूला विचारण्यात आले की “तुम्ही आतापर्यंत केलेली सर्वात साहसी गोष्ट कोणती आहे?” यावर त्याने , “मी न्यूझीलंडमध्ये बंजी जंप केली आहे,” असे उत्तर दिले. या मुलाखतीत महेश बाबूला “शेवटचा चित्रपट कोणता होता ज्याने तुम्हाला रडवले?”असे विचारताच त्याने पटकन ‘द लायन किंग’ चित्रपटाचे नाव घेतले. तर “दिग्दर्शक म्हणून तुझा कोणता चित्रपट पुन्हा बनवायला आवडेल?” या प्रश्नावर त्याने ‘ओक्कडू’ चित्रपटाचे नाव घेतले. तसेच त्याच्या आवडत्या चित्रपटाबद्दल विचारताच महेश बाबूने ‘अल्लुरी सिताराम’ चित्रपटाचे नाव घेतले. थोडक्यात या मुलाखतीत महेश बाबूने अनेक प्रश्नांची मजेशीर उत्तरे दिली आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हे देखील वाचा