×

Sarkaru Vaari Paata | चित्रपटाचे कलेक्शन घसरताच बदलले महेश बाबूचे सूर; म्हणाला, ‘मी तर गंमत करत होतो!’

दाक्षिणात्य अभिनेता महेश बाबूचा (Mahesh Babu) नुकताच प्रदर्शित झालेला ‘सरकारू वारी पाटा’ या चित्रपटाने चिरंजीवी (Chiranjeevi) आणि त्यांचा मुलगा राम चरण (Ram Charan) अभिनीत ‘आचार्य’ चित्रपटाच्या पावलावर पाऊल ठेवलं आहे. या पिता-पुत्राच्या चित्रपटाने पहिल्याच दिवशी नोटांचा पाऊस पाडला. नवीन विक्रमही प्रस्थापित केले. पण, त्यानंतर हा चित्रपट तेलुगुचा ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ बनला! आता गुरुवारी (१२ मे) प्रदर्शित झालेल्या महेश बाबूच्या तेलुगू चित्रपट ‘सरकारू वारी पाटा’चीही तीच अवस्था होताना दिसत आहे. रिलीझच्या पहिल्याच दिवशी या चित्रपटाने धमाकेदार सुरुवात केली. ‘आरआरआर’ नंतर आंध्र प्रदेश आणि निजामच्या चित्रपट वितरण प्रदेशात दुसऱ्या चित्रपटाचा विक्रमही केला. परंतु चित्रपटाचे कलेक्शन त्याच्या रिलीझच्या दुसऱ्याच दिवशी निम्म्याहून कमी झाले. तसेच महेशबाबूचा सूरही शुक्रवारी बदलला. आता तो म्हणतोय की, त्याचा हिंदी चित्रपटांना विरोध नाही आणि त्याला हिंदी चित्रपट करायचेही आहेत.

महेश बाबू एंटरटेनमेंटच्या ‘मेजर’ चित्रपटाच्या ट्रेलर लाँचच्या वेळी देशभरातून जमलेल्या पत्रकारांसमोर फुशारकी मारण्याचा प्रयत्न करत असताना, महेश बाबूने स्वतःचा पायही कुऱ्हाडीवर ठेवला. त्याने जे काही सांगितले आणि ज्या पद्धतीने तो बोलला, ते सर्व कॅमेऱ्यात रेकॉर्ड झाले आहे. आता तो म्हणत आहे की, तो हे सर्व गंमतीत म्हणाला होता. (sarkaru vaari paata box office collection day 2 mahesh babu changes his tone for hindi cinema)

१२ मे रोजी रिलीझ झाल्यानंतर, पहिल्याच दिवशी ‘सरकारू वारी पाटा’ या चित्रपटाने देशभरात ४७.४० कोटी रुपयांची कमाई केली होती. गुरुवारी रात्री उशिरापासून शुक्रवारी सकाळपर्यंत चित्रपटाच्या एकूण कलेक्शनबाबत अनेक दावे करण्यात आले. नवे-जुने सगळे रेकॉर्ड काढून, त्यानुसार ‘सरकारू वारी पाटा’ या चित्रपटाच्या यशाच्या कहाण्याही विणल्या गेल्या. पण, शुक्रवारी चित्रपटाच्या निर्मात्यांच्या उत्साहावर विरजण पडले. शुक्रवारी रात्री मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, महेश बाबूचा ‘सरकारू वारी पाता’ या चित्रपटाने रिलीझच्या दुसऱ्या दिवशीच मैदान सोडण्याचे संकेत दिले आहेत.

‘सरकारू वारी पाटा’ या चित्रपटाने शुक्रवारी संपूर्ण देशात केवळ १६.५० कोटींची कमाई केली आहे, असे प्राथमिक आकडे सांगतात. हे त्याच्या गुरुवारच्या कलेक्शनच्या एक तृतीयांश जवळ आहे. एका दिवसात चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये एवढी मोठी घसरण, हा देखील एक विक्रम आहे. शुक्रवारी ‘सरकार वारी पता’ या चित्रपटाची अवस्था पाहता चित्रपटाचा नायक महेश बाबूच्या चेहऱ्याचा रंग उडाला असेल, हे नक्कीच!

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

Latest Post