चित्रपट निर्माते आणि आलिया भट्टचे (Alia Bhatt) वडील महेश भट्ट (Mahesh Bhatt) त्यांच्या आयुष्यात नवीन जबाबदारी घेण्यासाठी स्वत:ला तयार करत आहेत. लवकरच आलिया भट्ट आणि रणबीर कपूर (Ranbir Kapoor) त्यांच्या पहिल्या मुलाचे या जगात स्वागत करणार आहेत. म्हणजेच महेश भट्ट लवकरच आजोबा होणार आहेत. अशा परिस्थितीत, महेश भट्ट यांनी मुलगी आलियाच्या गरोदरपणावर प्रतिक्रिया दिली आहे.
खरं तर, ७३ वर्षीय चित्रपट निर्माते महेश भट्ट एका चॅट शोमध्ये पोहचले होते. यावेळी त्यांनी आजोबा झाल्याचा आनंद व्यक्त करण्यासोबतच आलिया भट्टबद्दलही सांगितले. जेव्हा महेश भट्ट यांना आजोबा बनण्याबाबत प्रश्न विचारण्यात आला, तेव्हा ते म्हणाले की ही एक भूमिका आहे जी साकारणे त्यांच्यासाठी थोडे कठीण आहे. (mahesh bhatt reacted on alia bhatt pregnancy)
ते म्हणाला, “मी अजूनही वडिलांच्या भूमिकेतून बाहेर येणे बाकी आहे. जेव्हा तुम्हाला एक मुलगी असते, जी खूप हुशार आहे आणि तुम्हाला तिच्या सर्व कामगिरीचा खूप अभिमान वाटतो आणि तुम्हाला कळते की ती लवकरच आई होणार आहे, तेव्हा तुम्ही आकाशाकडे बघता आणि जीवन आणि निसर्गाच्या सौंदर्याबद्दल आश्चर्यचकित होता.” यापूर्वीही एका मुलाखतीदरम्यान महेश भट्ट म्हणाले होते की, आलिया आणि रणबीरचे मूल निराळे असेल.
आलिया भट्टने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करून तिच्या गरोदरपणाची घोषणा चाहत्यांशी शेअर केली होती. आलिया आणि रणबीर २०१७ पासून एकमेकांना डेट करत होते आणि या वर्षी एप्रिलमध्ये त्यांनी लग्न केले. आता दोघेही अयान मुखर्जीच्या ‘ब्रह्मास्त्र’मध्ये पहिल्यांदाच एकत्र दिसणार आहेत. हा चित्रपट ९ सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा