Friday, March 29, 2024

जेव्हा महेश भट्टच्या ‘या’ वक्तव्यावर संतापली सुष्मिता सेन, रागाच्या भरात अभिनेत्रीने दिला होता ‘इशारा’

हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आणि मिस युनिव्हर्स सुष्मिता सेन (Sushmita Sen) तिच्या बिनधास्त अंदाजासाठी ओळखली जाते. अलीकडेच सुष्मिता सेनने बॉलिवूड अभिनेत्री ट्विंकल खन्नाच्या (Twinkle Khanna) ट्वीक शोमध्ये हजेरी लावली होती. यावेळी सुष्मिताने तिच्या आयुष्यातील सर्व किस्से उघडपणे सांगितले. त्याचवेळी सुष्मिता सेनने सांगितले की, एकदा बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक महेश भट्ट (Mahesh Bhatt) यांच्या एका गोष्टीवर तिला खूप राग आला होता.

काय होते संपूर्ण प्रकरण
ट्विंकल खन्नाच्या शोमध्ये दिलेल्या मुलाखतीत सुष्मिता सेनने सांगितले की, मिस युनिव्हर्सचा किताब जिंकून जेव्हा ती घरी परतली तेव्हा तिला दिग्दर्शक महेश भट्ट यांचा फोन आला. सुष्मिता म्हणाली, “महेशने मला फोन केला आणि सांगितले की तुला माझ्या पुढच्या चित्रपटात काम करायचे आहे. तेव्हा मी त्यांना सांगितले की, मला अभिनय येत नाही आणि मी कोणतेही क्लास घेतलेले नाहीत. यावर महेश म्हणाले की, तू अभिनेत्री आहेस, असं मी म्हटलं नाही. त्यांनी खूप आत्मविश्वास दिला आणि त्यानंतर मी चित्रपटाच्या मुहूर्त सेटवर पोहोचले. जिथे मला रागाचा सीन द्यायचा होता. पण मी ते करू शकले नाही.” (Sushmita sen angry on mahesh bhatt on set)

“अशा अवस्थेत महेश सर्व लोकांसमोर मला म्हणाले की, अरे कुठून आलीय, काहीच येत नाहीये. मग मी रागाने माझ्या कानातले फेकले, त्यामुळे मी जखमी झाले आणि रडत रडत तिथून उठले आणि निघाले. मग महेश यांनी माझा हात धरून मला थांबवले. मी त्यांना रागात म्हणाले, की तुम्ही माझ्याशी असे बोलू शकत नाही. मात्र मला रागावण्याची ही महेश भट्टची युक्ती होती.”

यानंतर सुष्मिता सेनलाही समजले की, महेश भट्ट यांना असच हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज दिग्दर्शक म्हटले जात नाही. यानंतर सुष्मिता सेनने महेश दिग्दर्शित ‘दस्तक’ या चित्रपटातून आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात केली. त्यानंतर तिने बॉलिवूडमधील एकापेक्षा एक चित्रपटांमध्ये आपला अभिनय दाखवला.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

हे देखील वाचा