टेलिव्हिजनवरील सर्वात चर्चेत असणाऱ्या शोपैकी एक शो म्हणजे ‘बिग बॉस मराठी’ होय. या शोने प्रेक्षकांचे मनोरंजन करून अवघ्या तीन आठवड्यातच टीआरपीच्या यादीत अव्वल स्थान मिळवले आहे. या शोमधील स्पर्धक, टास्क या सगळ्या गोष्टी प्रेक्षकांना खूप आवडतात. सुरुवातीला हा शो फक्त हिंदीमध्ये सुरू होता, परंतु या शोची लोकप्रियता बघता गेल्या तीन वर्षापासून हा शो मराठीमध्ये सुरू झाला आहे. मराठी प्रेक्षक देखील शोला जोरदार प्रतिसाद देत आहेत. यासोबत दर आठवड्याच्या शेवटी महेश मांजरेकर हे सूत्रसंचालकाच्या भूमिकेत दिसतात. ते घरात जात नाहीत, परंतु घरात असणाऱ्या टीव्हीच्या माध्यमातून ते घरातील सदस्यांशी संवाद साधतात.
दर शनिवार आणि रविवार महेश मांजरेकर बिग बॉसच्या चावडीवर येतात. तसेच आठवडाभर काय काय झालं, या गोष्टीचा आढावा घेतात. याबद्दल घरातील सदस्यांना त्यांनी केलेल्या कृत्याबद्दल जाब विचारतात. ज्यांनी चांगली कामगिरी केली त्याची पाठ थोपटतात, तर ज्यांनी चुका केल्या, त्यांना खडेबोल सुनावतात. गेले तीन पर्व महेश मांजरेकर हा शो होस्ट करत आहेत. त्यामुळे त्यांना या भूमिकेत पाहायला प्रेक्षकांना देखील खूप आवडते.
यावर्षी त्यांची प्रकृती ठीक नसल्याने ते हा शो होस्ट करतील की नाही याबाबत अनेकांना प्रश्न पडला होता, परंतु या शोमध्ये त्यांना परत बघून सगळ्यांनाच खूप आनंद झाला. (Mahesh manjarekar taking 25 lakh for one episode of bigg Boss Marathi 3)
महेश मांजरेकर या शोसाठी किती मानधन घेत असतील?, असा प्रश्न अनेकांना पडला होता. अशातच माहिती समोर आली आहे की, महेश मांजरेकर एका एपिसोडसाठी २५ लाख एवढं मानधन घेतात. त्यांची ही रक्कम ऐकून अनेकांना धक्का बसला आहे, परंतु हिंदी बिग बॉस हा शो सलमान खान गेले १५ पर्व होस्ट करत आहेत. तो या शोमधून कोटी रुपयांचे मानधन घेतो. त्यामुळे सलमान खानच्या तुलनेत महेश मांजरेकर घेतात ती रक्कम खूपच कमी आहे, असे अनेकांचे म्हणणे आहे.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-‘साडी ऋतूने गिफ्ट दिली का?’, मराठमोळी अभिनेत्री सायली संजीवच्या फोटोवर चाहत्याची भन्नाट कमेंट
-तपकिरी रंगाच्या ड्रेसमध्ये खुललं स्पृहाचं सौंदर्य, पाहायला मिळाला अभिनेत्रीचा ग्लॅमरस अंदाज