Sunday, January 18, 2026
Home मराठी सकारात्मक बातमी! यशस्वी शस्त्रक्रियेनंतर महेश मांजरेकर आले घरी, तब्येतीमध्ये आधीपेक्षा सुधार

सकारात्मक बातमी! यशस्वी शस्त्रक्रियेनंतर महेश मांजरेकर आले घरी, तब्येतीमध्ये आधीपेक्षा सुधार

मराठी आणि हिंदीमधील यशस्वी अभिनेते आणि दिग्दर्शक असलेले महेश मांजरेकर सध्या अत्यव्यस्थ आहे. नुकतेच महेश मांजरेकरांना महेश यांना मूत्राशयाचा कर्करोग झाल्याचे समोर आले आहे. महेश यांना उपचारासाठी मुंबईतील एच एन रिलायन्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर शस्रक्रिया करण्यात आली आहे. सध्या महेश यांची प्रकृती स्थिर असून ते त्यांच्या राहत्या घरी विश्रांती घेत आहेत.

त्यांच्या तब्येतीबद्दल माहिती देताना सुदेश मांजरेकर यांनी सांगितले की, “महेश आता ठीक आणि फिट असून, ते आराम करत आहे. हो, तीन महिन्यांपूर्वी त्यांनी त्यांना झालेल्या मूत्राशयाचा कर्करोगाची शस्त्रक्रिया केली असून, सध्या ते त्यांच्या घरी आराम करत आहे. याबद्दल कोणालाच कोणतीच माहिती नव्हती.” (mahesh manjrekar health after cancer surgery)

सोबतच महेश मांजरेकर यांच्या मुलीने सई मांजरेकरने तिच्या वडिलांच्या तब्येतीची माहिती देताना सांगितले की, “ते आता ठीक आहे. आधीपेक्षा त्यांच्या तब्येतीत चांगली सुधारणा होत असून, मी आता यापेक्षा धिक माहिती देऊ शकत नाही. महेश मांजरेकर लवकरच यातून बाहेर येऊन त्यांचा कॅन्सरवरील उपचार आणि बरे होण्याचा अनुभव सर्वांना सांगू इच्छिता. आम्ही त्यांच्या या निर्णयाचा सन्मान करत आहोत. आता ते काहीच बोलण्याच्या स्थितीमध्ये नाही. लवकरच ते होऊन स्वतः सर्व सांगितलं तोपर्यंत वाट बघूया. ”

महेश मांजरेकर हे हिंदीसोबतच मराठीमध्ये देखील यशस्वी अभिनेते आणि दिग्दर्शक म्हणून ओळखले जातात. त्यांनी हिंदीमध्ये ‘वॉन्टेड’,’रेडी’, ‘दबंग’, ‘जिंदा’, ‘मुसाफिर’, ‘साहो’, ‘बाजीराव मस्तानी’, ‘सिंघम रिटर्न’, ‘जय हो’, ‘हिम्मतवाला’, ‘तीन पत्ती’, ‘जय हो’, ‘कांटे’ आदी अनेक चित्रपटात भूमिका साकारल्या आहेत. मराठीमध्ये तर त्यांनी अनेक हृदयस्पर्शी कथा पडद्यावर उत्तम पद्धतीने उतरवल्या असून, त्यात ‘काकस्पर्श’, ‘मी शिवाजी राजे भोसले बोलतोय’, ‘नटसम्राट’ आदी अनेक चित्रपटांचा समावेश आहे. महेश मांजरेकर हे मराठी बिग बॉस देखील होस्ट करताना दिसतात.

 

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-अपारशक्ती खुराणा लवकरच होणार बाबा, शेअर केला पत्नीच्या डोहाळे जेवणाचा सुंदर व्हिडिओ

-‘तुम्ही मला टक लावून पाहत होता पण…’, म्हणत प्रिया बापटकडून फोटो शेअर

-बोल्ड आणि डॅशिंग! ‘दिलबर गर्ल’ नोरा फतेहीचा नवीन लूक आला समोर

हे देखील वाचा