Friday, July 5, 2024

‘सलमान एकटा असून, त्याला खास व्यक्तीची गरज आहे’, म्हणत महेश मांजरेकरांनी केले दबंग खानच्या लग्नावर वक्तव्य

सलमान खान बॉलिवूडचा मोस्ट एलिजिबल बॅचलर आहे. यासोबतच तो संपूर्ण बॉलिवूडवर आणि बॉक्स ऑफिसवर निर्विवादपणे अधिराज्य गाजवतो. प्रत्येक सिनेमा मग भलेही तो फ्लॉप का असेना पण तरी तो १०० कोटींची कमाई करतो. हा करिश्मा फक्त आणि फक्त सलमानच करू शकतो. सलमानचे असलेले फॅन्स पाहून इतर कलाकरांना देखील त्याचा हेवा वाटतो. सलमान त्याच्या चित्रपटांमुळे किंबहुना त्याच्या कामामुळे सतत चर्चेत असतो. मात्र सलमान जेव्हा जेव्हा बाहेर जातो, तेव्हा त्याला एक प्रश्न हमखास विचारला जातो आणि तो म्हणजे तो लग्न कधी करणार? कधी कधी तर वाटते की हा जागतिक चर्चा प्रश्न ठरत आहे. इतकी घाई त्याच्या फॅन्सला आणि लोकांना त्याच्या लग्नाची झाली आहे.

वयाच्या ५५ व्या वर्षी देखील सलमानचा कमालीचा फिटनेस आणि त्याचे सिनेमे नेहमीच प्रेक्षकांसाठी चर्चेचा विषय असतो. लवकरच सलमान खानचा ‘अंतिम’ हा सिनेमा प्रदर्शित होत आहे. मराठी चित्रपट ‘मुळशी पॅटर्न’चा हिंदी रिमेक असणाऱ्या या चित्रपटाने ट्रेलर नंतर प्रेक्षकांच्या मानत चित्रपटाबद्दल मोठी उत्सुकता निर्माण केली आहे. सध्या या सिनेमाचे जोरदार प्रमोशन सुरू आहे. या सिनेमाचे दिग्दर्शक असणारे महेश मांजरेकर यांनी चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान सलमानच्या लग्नावर त्यांचे मत मांडले आहे.

महेश मांजरेकर आणि सलमान खान हे खूप जवळचे आणि घनिष्ठ मित्र आहेत. नुकतेच एका मुलाखतीदरम्यान त्यांनी सांगितले की, “अशा अनेक गोष्टी आहेत ज्या मी सलमानसोबत करू शकतो. जे दुसरे कोणी करू शकत नाही. मी सलमानला सांगतो की, तुला लग्न करायचे नाही, काहीच समस्या नाही, मात्र मला सलमानच्या मुलाला बघायचे आहे. पण नेहमीप्रमाणे तो माझे हे बोलणे टाळतो. मला वाटते की, सलमान त्याच्या आयुष्यात एकटा असून, त्याला देखील त्याच्या जीवनात अशी व्यक्ती पाहिजे जिच्यासोबत तो त्याचे दुःख वाटू शकतो.”

पुढे महेश म्हणाले, “सलमानवर अनेकांचे प्रेम आहे. ते सलमानला भेटून निघाले की, त्यांच्या जवळच्या लोकांजवळ निघून जातात, पण सलमान कोणाकडे जाणार. सलमानचे भाऊ अरबाज आणि सोहेल त्यांच्या आयुष्यात व्यस्त आहेत. सलमानकडे खूप मोठे यश आहे. मात्र तो एका साधारण फ्लॅटमध्ये राहतो, आणि त्यातही तो एका सामान्य माणसासारखे जीवन जगतो.” सलमान खानचा आगामी ‘अंतिम’ सिनेमा २६ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-केवळ हजार रुपये घेऊन गौरीच्या शोधात मुंबईत आला होता शाहरुख, तर आज वर्षाला कमावतो ‘इतके’ कोटी

-जेव्हा करण जोहरने विचारला होता ‘न्यूड पोझ’बाबत प्रश्न, शाहरुख खानचे उत्तर ऐकून तुम्हीही व्हाल हैराण

-खरंच की काय! अभिनयामुळे नव्हे, तर नाकामुळे मिळाला होता ‘किंग खान’ला पहिला चित्रपट

हे देखील वाचा