Thursday, July 18, 2024

Accident | चेहऱ्यात घुसल्या होत्या तब्बल 67 काचा, महिमा चौधरीने केला ‘त्या’ भयावह रात्रीचा खुलासा

बॉलिवूडमध्ये असे अनेक स्टार्स आहेत, ज्यांनी एकेकाळी आपल्या करिअरमध्ये खूप यश मिळवले होते. पण ते चित्रपटसृष्टीतून अचानक गायब झाले. त्याचबरोबर काही स्टार्स असेही आहेत, ज्यांना काही कारणामुळे इंडस्ट्रीपासून दूर जावे लागले. आज आम्ही अशाच एका अभिनेत्रीबद्दल सांगणार आहोत. या अभिनेत्रीनेही उत्तम अभिनय केला आणि ती खूप सुंदरही आहे. ही दुसरी कोणी नसून महिमा चौधरी (Mahima Chaudhry)आहे.

नुकतेच महिमा चौधरीने तिच्या करिअर आणि वैयक्तिक आयुष्याबद्दल खुलेपणाने चर्चा केली. महिमा चौधरीच्या चित्रपट कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले तर, तिने ‘परदेस’ चित्रपटाद्वारे इंडस्ट्रीत प्रवेश केला. या चित्रपटाद्वारे तिने प्रेक्षकांच्या मनात घर केलं. पण महिमाच्या आयुष्यात एक अशी घटना घडली, ज्यामुळे तिचं सौंदर्य आणि करिअरही उद्ध्वस्त झालं. (mahima choudhry revealed how one accident ruined her life and career)

महिमा गेल्या अनेक वर्षात या अपघाताबद्दल काहीच बोलली नव्हती. पण आता तिने सांगितले आहे की ही त्यावेळची गोष्ट आहे, जेव्हा ती एका चित्रपटाच्या शूटिंगच्या निमित्ताने बाहेर पडली होती आणि तिची कार एका ट्रकला धडकली. ही घटना खूपच भयावह होती. यावेळी तिच्या गाडीची काच पूर्णपणे तुटून, त्या काचेचा एक तुकडा तिच्या चेहऱ्यात घुसला. महिमाने सांगितले की, त्यावेळी तिला खूप वेदना होत होत्या. तिला लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. जिथे शुद्धीवर आल्यावर तिने आरशात तिचा चेहरा पाहिला आणि ती घाबरली.

महिमाच्या म्हणण्यानुसार, तिच्या चेहऱ्यात 67 काचेचे तुकडे आढळले, त्यानंतर तिच्या चेहऱ्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. तिच्यावर ही शस्त्रक्रिया बराच काळ सुरू होती. यादरम्यान महिमाने स्वत:ला घरात कैद करून घेतले होते. कारण शस्त्रक्रियेदरम्यान उन्हात बाहेर जाण्यास पूर्णपणे मनाई होती. महिमा म्हणाली की, या काळात तिला तिच्या करिअरबद्दल खूप काळजी वाटत होती, कारण त्यावेळी तिच्याकडे अनेक ऑफर्स होत्या.

महिमाने असेही म्हटले होते की, तिने ही गोष्ट लपवून ठेवली. कारण तिला भीती होती की जर लोकांना हे कळले, तर त्यांना वाटेल की तिचा चेहरा खराब झाला आहे, म्हणून तिने स्वतःला चित्रपटांपासून दूर केले. पण नंतर घरच्यांनी धीर दिल्याने ती पुन्हा जगायला शिकली.

हेही वाचा-
‘परदेश’साठी 3000 मुलींमधून झाली होती महिमा चौधरीची निवड, असे आहे सिनेसृष्टीतील करिअर
ज्या वेगाने आली, त्याच वेगाने झाली या क्षेत्रातून गायब; जाणून घ्या महिमा चौधरीबद्दल

हे देखील वाचा