Friday, December 8, 2023

ज्या वेगाने आली, त्याच वेगाने झाली या क्षेत्रातून गायब; जाणून घ्या महिमा चौधरीबद्दल

बॉलिवूड अभिनेत्री महिमा चौधरीने (Mahima chaudhary) आपल्या अदाकारीने आणि सौंदर्याने प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले. महिमाने आपल्या अभिनय कारकीर्दीत अनेक सुपरहिट चित्रपट केले. महिमा तिच्या पहिल्याच चित्रपटातून रातोरात स्टार बनली. १९९७ मध्ये तिने सुभाष घई यांच्या ‘परदेस’ या चित्रपटातून तिने रुपेरी पडद्यावर पदार्पण केले होते. या चित्रपटात तिच्यासोबत बॉलिवूडचा किंग खान म्हणजे शाहरुख खान होता. हा सिनेमा सुपरहिट झाला आणि महिमाच्या करियरला मोठी भरारी मिळाली.

महिमा चौधरीचा जन्म १३ सप्टेंबर १९७३ रोजी पश्चिम बंगालच्या दार्जिलिंग येथे झाला. तिने दार्जिलिंगच्याच डाउन हिल स्कूलमधून शिक्षण घेतले. त्यानंतर तिने लॉरेन्टो स्कूलमधून महाविद्यालयीन शिक्षण घेतले. महिमाला सुरुवातीपासूनच चित्रपटांची आवड होती. १९९० मध्ये तिने शिक्षण सोडून मॉडेलिंगची वाट धरली. याच दरम्यान, तिने शाहरुख ऐश्वर्यासोबत पेप्सीची जाहिरात ही केली होती. महिमा ज्या वेगाने या क्षेत्रात आली, ज्या वेगाने तिला या क्षेत्रात यश मिळाले त्याच वेगाने ती इथून गायब झाली.

महिमा सुरुवातीच्या दिवसांमध्ये व्हीजे म्हणून काम करत होती. इकडे प्रसिद्ध दिग्दर्शक सुभाष घई हे त्यांच्या ‘परदेस’ या चित्रपटासाठी नवीन चेहऱ्याच्या शोधात होते. सुभाष यांनी ३००० हून अधिक मुलींची ऑडिशन घेतली होती. पण त्यांना एकही मुलगी पसंत पडत नव्हती. जेव्हा महिमा त्यांच्या समोर आली, तेव्हा त्यांना त्याच्या सिनेमासाठी अभिनेत्री मिळाली. महिमाच या चित्रपटाची नायिका होणार हे त्यांनी पक्के केले. महिमाचे खरे नाव रितू चौधरी होते, मात्र तिचे खरे नाव बदलून महिमा नाव सुभाष घई यांनीच तिला दिले. या नावाने त्यांनी तिला या क्षेत्रात लाँच केले. या सिनेमा तुफान गाजला. इतकेच नव्हे तर महिमाला या चित्रपटाने सर्वोत्कृष्ट महिला पदार्पणाचा फिल्मफेअर पुरस्कार मिळवून दिले.

या चित्रपटानंतर महिमाकडे चित्रपटांची रांग लागली. तिने ‘डाग द फायर’, ‘धडकन’, ‘कुरुक्षेत्र’, ‘दिल है तुम्हारा’ आणि ‘बागवान’ यांसारखे चित्रपट केले. वेगवगेळ्या अभिनेत्यासोबत हिट सिनेमा देणारी महिमा २००८ नंतर अचानक इंडस्ट्रीतून गायब झाली. बऱ्याच काळानंतर म्हणजेच २०१६ मध्ये ती पुन्हा एकदा ‘चॉकलेट’ या बंगाली चित्रपटात दिसली.

या चित्रपटानंतर महिमाकडे चित्रपटांची रांग लागली. तिने ‘डाग द फायर’, ‘धडकन’, ‘कुरुक्षेत्र’, ‘दिल है तुम्हारा’ आणि ‘बागवान’ यांसारखे चित्रपट केले. पण २००८ नंतर ती अचानक इंडस्ट्रीतून गायब झाली. बऱ्याच काळानंतर म्हणजेच २०१६ मध्ये ती पुन्हा एकदा ‘चॉकलेट’ या बंगाली चित्रपटात दिसली.

एका मुलाखतीत महिमाने दिग्दर्शक सुभाष घईंवर मोठा आरोप केला ज्यामुळे सर्वांना मोठा धक्काच बसला. ज्या दिग्दर्शकाने तिला या इंडस्ट्रीमध्ये आणले त्याच्यावरच महिमाने तिचे करियर खराब केल्याचा आरोप केला. या मुलाखतीमध्ये तिने सांगितले होते की, “सुभाष घई यांनी माझ्या विरोधात कट रचला, ज्यामुळे मला बॉलिवूडमध्ये काम मिळणे बंद झाले. अशा स्थितीत फक्त चारच लोक माझ्या सोबत उभे होते. ते म्हणजे सलमान खान, संजय दत्त, डेव्हिड धवन आणि राजकुमार संतोषी. महिमा चौधरी सध्या चित्रपटांपासून दूर असली तर ती सोशल मीडियावर नेहमी सक्रीय असते. मंदिर बेदीच्या पतीच्या निधनानंतर महिमा जेव्हा तिला भेटायला गेली तेव्हा तिला तिच्या फोटोग्राफर्सला दिलेल्या पोझवर ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही नक्की वाचा-
जन्नत गर्ल सोनल चौहानचे बोल्ड फोटोशूट!
‘हे’ बॉलिवूड कलाकार आहेत सर्वात रागीट, अनेकवेळा दिसला रुद्रावतार
जॅकलीनला दिल्ली पोलिसांकडून समन्स; 14 सप्टेंबरला हजर राहण्याचे निर्देश

हे देखील वाचा