Thursday, December 12, 2024
[aioseo_breadcrumbs]

मालिका सुरू होण्याआधीच मायराच्या व्हिडिओचा इंटरनेटवर धुमाकूळ, नेटकऱ्यांना भावला चिमुकल्या अभिनेत्रीची निरागसता

मराठी मालिका या प्रत्येक महाराष्ट्रीयन माणसाचा जिव्हाळ्याच विषय असतो. दिवसभराच्या धावपळीनंतर रात्री कुटुंबासोबत या मालिका बघणे प्रत्येकालाच समाधान देतात. यात झी मराठी ही वाहिनी खूप लोकप्रिय आहे. अनेकांच्या घरात या वाहिनीवरील मालिका पाहिल्या जातात. अशातच काही दिवसांपूर्वी सगळ्या प्रेक्षकांसाठी एक गोड बातमी आली आहे. ती म्हणजे झी मराठीवर तब्बल ५ नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. या सगळ्या मालिकांचे प्रोमो टीव्हीवर तसेच सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यात एका मालिकेचा प्रोमो मात्र चांगलाच भाव खाऊन जात आहे. ती मालिका म्हणजे ‘माझी तुझी रेशीमगाठ’ होय. या मालिकेत अभिनेत्री प्रार्थना बेहेरे आणि श्रेयश तळपदे मुख्य भूमिकेत आहेत. या दोन लोकप्रिय कलाकारांना एकत्र पाहून त्यांच्या चाहत्यांना खूपच आनंद झाला आहे.

प्रार्थना आणि श्रेयश यांना एकत्र काम करताना बघण्यासाठी सगळेच खूप उत्सुक आहेत. या सगळ्यात आणखी एक व्यक्ती प्रेक्षकांचे चांगलेच आकर्षण ठरत आहे. ती म्हणजे या मालिकेतील लहान मुलगी म्हणजेच मायरा वैकुळ होय. प्रेक्षकांना तिचा अभिनय खूप आवडला आहे. तसेच त्या चिमुकलीला दररोज बघण्यासाठी सगळेच उत्सुक आहेत. मागील अनेक दिवसांपासून मायराचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. ज्याला सोशल मीडिया युजर्सचा जोरदार प्रतिसाद मिळत आहे. अशातच तिचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. (majhi tujhi reshimgath fame mayra vaikul’s video viral on social media )

झी मराठीच्या ऑफिशिअल इंस्टाग्राम अकाउंटवरून मायरा आणि प्रार्थनाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यांच्या या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, मायरा आणि प्रार्थना बसलेल्या असतात. तेव्हा मायरा प्रार्थनाला म्हणते की, “आई मला पाणी आण ना.” यावर प्रार्थना म्हणते की, “जा आणि तू घेऊन ये.” नंतर मायरा म्हणते की, “आई प्लिज प्लिज आण ना.” प्रार्थना म्हणते की, “तिथे येऊन फटके देईल हा.” यावर मायरा म्हणते की,”फटके द्यायला येशील तेव्हा पाणी पण घेऊन ये.” यानंतर प्रार्थना तिच्याकडे पाहतच राहते. त्यांचा हा मजेशीर व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे.

मायराचा अभिनय पाहून सर्वांनाच तिचे खूप कौतुक वाटत आहे. त्यांची ‘माझी तुझी रेशीमगाठ’ ही मालिका २३ ऑगस्टपासून सोमवार ते शनिवार रात्री ८:३० वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

 

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-रक्ताच्या नात्यापलीकडे जाऊन ‘हे’ कलाकार आपल्या भावा- बहिणींसोबत साजरे करतात रक्षाबंधन

‘माझ्याशी नीट बोलायचं हं…!’ म्हणत प्राजक्ताने अतिशय हटके अंदाजात भावाला दिल्या रक्षाबंधनाच्या शुभेच्छा

‘रियल’ लाइफ भावाबहिणींच्या जोड्या, ज्या गाजवतायेत मोठा पडदा; तर ‘या’ कलाकारांचा आहे यादीत समावेश

हे देखील वाचा