जेव्हा एखाद्या चॅनेलवर मालिका सुरु होते, तेव्हा ती संपणार हे नक्कीच असते. प्रत्येक गोष्टीला शेवट असतोच. तसाच शेवट मालिकांना देखील आहे. मागील बऱ्याच काळापासून मराठी मालिका विश्वामध्ये सर्वात जास्त गाजलेली आणि हिट झालेली मालिका म्हणजे ‘माझी तुझी रेशीमगाठ’. श्रेयस तळपदे आणि प्रार्थना बेहेरे आणि बालकलाकार असणाऱ्या मायरा वैकुळ यांची मुख्य भूमिका असलेल्या या मालिकेने पहिल्यापासूनच प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला. कदाचित ही अशी मालिका असेल जिचा पहिलाच प्रोमो तुफान गाजला आणि सोशल मीडियावर हिट देखील झाला. अशी ही मालिका आता लवकरच बंद होणार आहे.
View this post on Instagram
‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेला प्रेक्षकांनी अमाप प्रेम दिले. खरंतर ही मालिका सप्टेंबर २०२२ मधेच संपणार होती. मात्र प्रेक्षकांचे अमाप प्रेम आणि त्यांच्या आग्रहाखातर मालिकेला काही महिने वाढवले गेले. मात्र आता ही मालिका खरंच संपणार आहे. झी मराठी वाहिनीने त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून याबद्दल एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये २२ जानेवारीला मालिकेचा शेवटचा महाएपिसोड होणार आहे. सध्या मालिकेमध्ये नेहाची स्मरणशक्ती गेली असून, ती अनुष्का म्हणून जगत आहे. मात्र आता तिला परी आणि यश यांच्यामुळे ती नेहा असल्याचे आठवणार आणि मालिकेचा शेवट गोड होणार आहे. मालिका संपनार असल्याचे चॅनेलने जाहीर केल्यानंतर प्रेक्षकांनी मालिका न संपवण्याची विनंत करत. ‘अशी मालिका पुन्हा होणे नाही’, ‘प्लीज मालिका बंद करू नका’, ‘परीला खूप मिस करू’, अशा कमेंट केल्या आहेत. तर काहींनी याच कलाकारांना घेऊन एखादी नवीन मालिका सुरू करा. असे देखील सुचवले आहे.
नवरा सोडून गेल्यानंतर आपल्या मुलीला घेऊन तिच्यासोबत राहून, तिला मोठे करण्याच्या उद्देशाने काम करणारी नेहा आणि श्रीमंत, समजुदार, माणुसकी असलेला प्रेमळ यश यांची प्रेमकथा सर्वांनाच फार आवडली. या मालिकेच्या माध्यमातून आपल्याला अनेक चेहरे बऱ्याच काळानंतर टेलिव्हिजनवर पाहायला मिळाले. या मालिकेचे सर्वात मोठे आकर्षण होते ते बालकलाकार मायरा अर्थात परी. परीने लहान असूनही तिच्या अभिनयाने आणि निरागसतेने सर्वच प्रेक्षकांची मने जिंकून घेतली. प्रार्थनाने आणि श्रेयसने देखील या मालिकेच्या निमित्ताने बऱ्याच काळानंतर टीव्हीवर पदार्पण केले.
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
लॅव्हेंडर गाऊनमध्ये हरनाज संधूने घातला धुमाकूळ , फोटो पाहून चाहते झाले वेडे
‘आता शेंगदाणे विकू…,’, म्हणत अक्षया देवधरने मुंबई ट्रॅफिकवर भाष्य करत शेअर केली पोस्ट