Sunday, June 2, 2024

लॅव्हेंडर गाऊनमध्ये हरनाज संधूने घातला धुमाकूळ , फोटो पाहून चाहते झाले वेडे

हरनाज कौर संधू सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती अनेकदा तिचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करते, जे पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक असतात. ती अनेक रिऍलिटी शोमध्येही दिसली आहे. तिची ही स्टाइल चाहत्यांना प्रचंड आवडते. अशातच हरनाजने तिच्या लेटेस्ट फोटोशूटचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. फाेटाेमध्ये ती लॅव्हेंडर रंगाचा थाई हाय गाऊन परिधान करताना दिसत आहे. यामध्ये ती खूपच सुंदर दिसत असून तिने तिचे केस खुले साेडले आहेत आणि ती पायऱ्यांवर उभी राहून पोज देत आहे.

फोटो शेअर करताना हरनाज कौर संधू (harnaaz sandhu) हिने लिहिले की, “योग्य वेळी आवाज उठवण्यासाठी मी माझा आवाज वाचवला आहे.” हरनाज कौर संधूचा हा फोटो इंस्टाग्रामवर येताच तुफान व्हायरल हाेत आहे. तिला 13 तासांत 1.25 लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. त्याचबरोबर तिच्या फोटोंवर 1000 हून अधिक कमेंट्स आल्या आहेत. चाहते हरनाजच्या या फाेटाेवर ‘सुंदर’, ‘खूप चांगले’, ‘राणी’, ‘सुंदर’, ‘जबरदस्त’ अशा भन्नाट कमेंट करत आहेत.

हरनाज कौर संधूने यापूर्वी एक फोटो शेअर केला होता. यामध्ये ती सुष्मिता सेन आणि लारा दत्ता यांचा प्रिंटेड ड्रेस परिधान करताना दिसत हाेती. या दाेघींचा हा फाेटाे जिंकल्यानंतरचा आहे. फोटो शेअर केल्यानंतर दोघीनी तिला शुभेच्छाही दिल्या. यानंतर सुष्मिता सेननेही यावर प्रतिक्रिया देत तिचे आभार मानले.

हरनाज काैर संधू लवकरच चित्रपटांमध्येही दिसणार आहे. ती जिममध्ये खूप मेहनत करते. तिची खूप हॉट आणि बोल्ड स्टाइल आहे. इंस्टाग्रामवर तिचे 47 लाख फॉलोअर्स आहेत.(harnaaz sandhu bold photos in lavender gown fans fans reaction goes viral on social media)

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
सुशांत सिंगच्या वाढदिवसाच्या दिवशी बहिणींनी दिला भावाच्या आठवणींना उजाळा, शेअर केले व्हिडिओ आणि फोटो

‘गांधी गोडसे: एक युद्ध’ चित्रपटाला नेटकऱ्यांनी दाखवले काळे झेंडे, आंदोलन करत म्हणाले, ‘तुम्ही नथुराम गोडसे…’

हे देखील वाचा