Monday, June 23, 2025
Home साऊथ सिनेमा Major | कोण आहे अदिवी शेष? ‘बाहुबली’ चित्रपटात साकारलीय ‘ही’ दमदार व्यक्तिरेखा

Major | कोण आहे अदिवी शेष? ‘बाहुबली’ चित्रपटात साकारलीय ‘ही’ दमदार व्यक्तिरेखा

अभिनेता अदिवी शेष (Adivi Sesh) सध्या त्याच्या आगामी ‘मेजर’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. त्याचा हा चित्रपट ३ जूनला प्रदर्शित होत आहे. २६/११ च्या मुंबई हल्ल्यात शहीद झालेले मेजर संदीप उन्नीकृष्णन यांच्या जीवनावर हा चित्रपट आधारित आहे. यामध्ये संदीप उन्नीकृष्णन यांची भूमिका अदिवी शेषने साकारली आहे. अदिवी शेषचे पूर्ण नाव अदिवी शेष सनी चंद्र आहे. तो टॉलिवूड चित्रपटसृष्टीचा मोठा स्टार आहे. त्यांची प्रतिभा केवळ अभिनयापुरती मर्यादित नसून, दिग्दर्शन आणि पटकथा लेखन या क्षेत्रातही तो सक्रिय आहे. अदिवीने प्रामुख्याने तेलुगू भाषेतील चित्रपटांमध्ये काम केले आहे. जाणून घेऊया त्याचा चित्रपट प्रवास…

परदेशात घेतलंय शिक्षण
हैदराबाद येथे जन्मलेल्या अदिवी शेषचे पालनपोषण बर्कले, कॅलिफोर्निया येथे झाले. त्याने सॅन फ्रान्सिस्को स्टेट युनिव्हर्सिटीमधून दिग्दर्शन आणि अभिनयाचे शिक्षण घेतले. यानंतर, सिनेजगतात करिअर करण्यासाठी तो भारतात परतला. (major who is adivi sesh telugu actor)

‘कर्मा’पासून सुरू झाला चित्रपट प्रवास
अदिवीने २००२मध्ये ‘सोनथम’ चित्रपटाद्वारे पदार्पण केले. पण यामध्ये तो छोट्या गेस्ट अपिअरन्समध्ये दिसला. अदिवीने २०१० साली ‘कर्मा’ चित्रपटाद्वारे मुख्य अभिनेता आणि दिग्दर्शक म्हणून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. विशेष म्हणजे, या चित्रपटाची पटकथाही त्यानेच लिहिली आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत अमेरिकन अभिनेत्री जेड टेलर दिसली होती. ‘कर्मा’ हा चित्रपट संपूर्ण अमेरिकन तांत्रिक क्रूसह संपूर्णपणे यूएसमध्ये चित्रित केलेला पहिला तेलुगू चित्रपट आहे. अदिवी ‘पंजा’, ‘क्षनम’, ‘आमी तुमी’ आणि स्पाय थ्रिलर चित्रपट ‘गुडाचरी’साठी प्रसिद्ध आहे. ‘बाहुबली’ चित्रपटात त्याने भल्लादेवाच्या मुलाची व्यक्तिरेखा साकारून आपले अभिनय कौशल्य दाखवले आहे. त्याच्या जबरदस्त लुक आणि अभिनयासाठी तो चाहत्यांच्या पसंतीस उतरला.

खलनायकाच्या व्यक्तिरेखेमध्ये मिळवली ​​वाहवा
नायक म्हणून उत्तम छाप पाडणाऱ्या अदिवीने २०११ मध्ये आलेल्या ‘पंजा’ चित्रपटात नकारात्मक भूमिका साकारली होती. विष्णुवर्धन दिग्दर्शित चित्रपटात तो पवन कल्याण, सारा जेन डायस आणि अंजली लावनियासोबत दिसला होता. यामध्ये त्यांनी मुन्ना ही व्यक्तिरेखा साकारली होती, ज्याचे खूप कौतुक झाले होते.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

हे देखील वाचा