Tuesday, April 16, 2024

Birthday Special! ‘बाहुबली’ने दिली खरी ओळख, तर ‘असा’ आहे अदिवि शेषचा सिनेप्रवास

अभिनेता अदिवि शेष (Adivi Sesh) सध्या खूप चर्चेत आहे. अदिविचा ‘मेजर’ (Major) हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. २६/११ च्या हल्ल्यात शहीद झालेल्या मेजर संदीप उन्नीकृष्णन यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट आहे. ११ फेब्रुवारी २०२२ रोजी प्रदर्शित होणारा हा चित्रपट अदिवि यांच्या आजपर्यंतच्या प्रवासात सर्वात महत्वाचा ठरणार आहे. चाहत्यांना या चित्रपटाची उत्सुकता लागली आहे. वाढदिवसाच्या पार्श्वभूमीवर आपण त्याच्या जीवनाबद्दल जाणून घेणार आहोत.

तेलुगू चित्रपटांमधून प्रेक्षकांवर आपली छाप उमटवणाऱ्या अदिविचा जन्म १७ डिसेंबर १९८५ रोजी हैद्राबादमध्ये झाला. त्याचे बालपण परदेशात गेले. त्याने परदेशातच शिक्षण पुर्ण केले. लहानपणापासूनच त्याला अभिनयाची आवड होती. त्याने अभिनेता म्हणून २००२ मध्ये ‘सोनथम’ या चित्रपटात पदार्पण केले. अदिवि फक्त एक चांगला अभिनेताच नाही, तर उत्तम लेखक आणि दिग्दर्शक देखील आहे.

अदिविने २०१०च्या ‘कर्मा’ चित्रपटातून दिग्दर्शक आणि लेखक म्हणून पदार्पण केले, ज्यात जेड टेलर आणि शेर अली यांनीही मुख्य भूमिका केल्या होत्या. यात अदिविच्या भूमिकेचे कौतुक झाले. रेडिफने त्याच्या कामगिरीचे कौतुक करताना सांगितले की “अभिनयाच्या बाबतीत, अदिवी चांगले काम करतो. त्याचे स्क्रिप्टिंग कौशल्य देखील कौतुकास्पद आहे. त्याने तेलुगु सिनेमात काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न केला आहे.” अदिविने सिनेसृष्टीतील अनेक दिग्गज कलाकारांसोबत काम केले आहे. त्याने एसएस राजामौली यांच्या ‘बाहुबली’ या चित्रपटातदेखील काम केले आहे. त्याच्या अभिनयाचे सर्वत्र कौतुक केले होते.

‘मेजर’ हा चित्रपट अदिविच्या आयुष्याला कलाटणी देणारा ठरणार आहे. हा चित्रपट एकूण तीन भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. हिंदी, तेलुगू आणि मल्याळम् या तीन भाषेत प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटात अदिविसोबत सई मांजरेकर मुख्य भुमिकेत दिसणार आहे. अदिविने आत्तापर्यंतच्या प्रवासात अनेक पुरस्कार प्राप्त केले आहेत. तेलुगू इंडस्ट्रीमधील महत्वाचा मानला जाणाऱ्या नंदी अवॉर्डने देखील त्याला पुरस्कृत करण्यात आले आहे. त्याच्या ‘क्षणम’ या चित्रपटासाठी सर्वोत्तम स्क्रिनप्ले लेखक आणि सर्वोत्तम स्क्रिनप्लेसाठीचा अवॉर्ड देण्यात आला होता.

हेही वाचा-

हे देखील वाचा