बॉलिवूडमध्ये दरवर्षी अनेक स्टार किड्स येतात. काही या ठिकाणी आपली जागा बनवण्यात यशस्वी होतात, तर काही अपयशी होऊन या जगात कुठेतरी हरवून जातात. प्रतिभा सिन्हा (Pratibha Sinha) ही अशीच एक स्टारकिड आहे, जी भूतकाळातील सर्वोत्कृष्ट अभिनेत्री माला सिन्हा (Mala Sinha) यांची मुलगी आहे. प्रतिभाने बॉलिवूडमध्ये जवळपास १२ चित्रपटांमध्ये काम केले होते. पण अनेक चित्रपटांमध्ये काम करूनही प्रतिभाला अपेक्षित यश मिळाले नाही.
प्रतिभाचे बहुतेक चित्रपट अयशस्वी ठरले आणि तिच्या कामाची कोणीही दखल घेतली नाही. त्यामुळे अभिनेत्रीची फिल्मी कारकीर्द डळमळीत झाली आणि ती या सिनेसृष्टीत जणू हरवूनच गेली. प्रतिभाच्या फिल्मी कारकिर्दीतील एकमेव यश म्हणजे ‘राजा हिंदुस्तानी’ हा चित्रपट. ज्यामध्ये ती आमिर खानसोबत (Aamir Khan) ‘परदेसी परदेसी’ या गाण्यात परफॉर्म करताना दिसली होती. (mala sinha daughter pratibha sinha failed career and life facts)
या गाण्यात प्रतिभा एका बंजारनच्या गेटअपमध्ये दिसली होती आणि तिच्या नृत्याचे खूप कौतुक झाले होते. मात्र, प्रतिभाच्या व्यावसायिक जीवनाला मोठा धक्का तेव्हा बसला, जेव्हा तिचे नाव संगीत दिग्दर्शक नदीमसोबत (Nadeem) जोडले जाऊ लागले. नदीमवर टी-सीरीजचे प्रमुख गुलशन कुमार (Gulshan Kumar) यांच्या हत्येचा आरोप होता.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, प्रतिभा नदीमच्या प्रेमात वेडी झाली होती आणि तिने तिच्या करिअरवर लक्ष केंद्रित करणे बंद केले. प्रतिभाची आई माला सिन्हा यांना दोघांचे नाते अजिबात पटले नाही. मात्र प्रतिभाला त्याची पर्वा नव्हती आणि तिचे पुढे करिअर उद्ध्वस्त झाले. आता प्रतिभा गुमनामीचं जीवन असून, मुंबईत आईसोबत राहते.
ैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा










