Monday, May 4, 2026
Home बॉलीवूड ‘पार्टनर नव्हे, तर छोटा भाऊ गमावलाय मी!’ संगीतकर श्रवणच्या मृत्यूवर ढसाढसा रडला नदीम

‘पार्टनर नव्हे, तर छोटा भाऊ गमावलाय मी!’ संगीतकर श्रवणच्या मृत्यूवर ढसाढसा रडला नदीम

कोरोना व्हायरसची दुसरी लाट जशी जनसामान्यांना त्रास देत आहे, काहीशी तशीच ती बॉलीवूडकरांसाठीही अवघड ठरत आहे. बॉलीवूडच्या प्रसिद्ध संगीतकार जोडी नदीम-श्रवणपैकी श्रवण राठोड यांनी आज कोरोनामुळे जगाचा निरोप घेतला. प्रसिद्ध दिग्दर्शक अनिल शर्मा यांनी ट्विटरच्या माध्यमातून याची माहिती दिली. यानंतर लंडन स्थित त्यांचे मित्र व संगीतकार पार्टनर नदीन यांनी प्रतिक्रीया दिली आहे.

नदीम-श्रवण फेम नदीम १२ ऑगस्ट १९९७ रोजी  गुलशन कुमार यांच्या हत्येचा आरोप लागल्याने, भारतातून पळून गेले होते. लंडनमध्ये राहत असलेल्या नदीम यांनी त्यांच्या म्युझिक पार्टनर श्रवणच्या मृत्यूवर, एबीपी न्यूजसोबत फोनवर एक्स्क्लुझिव्ह संभाषण केले आहे. या संपूर्ण संभाषणादरम्यान नदीम आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवू शकले नाहीत आणि श्रवणची आठवण करुन अनेकदा रडले.

श्रवणच्या मृत्यूबद्दल नदीमची पहिली प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी एबीपी न्यूजने लंडनमध्ये त्यांना फोन केला. फोन उचलताच नदीम जोरजोरात रडू लागले. श्रवणच्या आठवणीत नदीम यांच्या तोंडातून निघालेले पहिले शब्द होते, “मी माझा लहान भाऊ गमावला, मी माझा धाकटा भाऊ गमावला.” संपूर्ण संभाषणात रडत रडत नदीम सतत हे वाक्य बोलतच होते.

“श्रवण आणि मी खूप काही सहन केलंय”:
काही क्षणानंतर नदीमने स्वत: ला सावरले आणि म्हणाले, “मी आणि श्रवण दोघांनीही आयुष्यात खूप त्रास सहन केला आहे. आम्हा दोघांना जे काही सहन करावे लागले, त्यात आमची काहीही चूक नव्हती.” असे बोलून त्यांना पुन्हा अश्रू अनावर झाले आणि ते रडू लागले. पुन्हा रडत ते म्हणाले, “आयुष्याने आमच्या दोघांना खूप त्रास दिला आहे, पण आम्ही दोघे स्वत: साठी काही करू शकलो नाहीत.” नदीमने त्यांच्या समस्यांबद्दल काहीही बोलण्यास नकार दिला आणि श्रवण यांच्याशी संबंधित काही आठवणी शेअर केल्या.

खूप भावुक झालेल्या नदीम यांनी पुन्हा एकदा स्वत: ला सावरण्याचा प्रयत्न केला आणि म्हणाले, “तो नेहमीच मला म्युजिक पार्टनर मानण्याऐवजी, मोठा भाऊ मानत असे आणि माझ्या मनातही त्याच्याबद्दल खूप आदर होता. लोक मला सांगायचे की जेव्हा जेव्हा मी श्रवणला फोन करायचो, तो दरवेळी माझ्या सन्मानार्थ उभा राहायचा आणि त्यानंतरच माझ्याशी फोनवर बोलायचा. तो माझा इतका आदर करत असे की, ते शब्दांत मांडणे कठीण जात आहे.”

भोजपुरी चित्रपट ‘दंगल’पासून केली होती सुरुवात:
नदीम-श्रवण यांनी ७० च्या दशकात ‘दंगल’ या भोजपुरी चित्रपटापासून संगीतकार जोडी म्हणून काम करायला सुरुवात केली. यानंतर १९८१ मध्ये आलेला ‘मैने जीना सीख लिया’ हा संगीतकार नदीम-श्रवणचा पहिला हिंदी चित्रपट होता.

श्रवणची कोणती गोष्ट तुम्हाला सर्वात जास्त आठवेल? एबीपी न्यूजच्या या प्रश्नावर नदीम म्हणाले की, “श्रवणची अशी कोणतीही गोष्ट नाही, जी मी कधी विसरू शकेन. त्याच्याशी संबंधित प्रत्येक गोष्ट माझ्या मनात अडकली आहे. माझ्या आयुष्यात कधीच मी त्याला विनंती केली नव्हती, तो माझं सर्वकाही ऐकत असे. तो माझे प्रत्येक बोलणे लहान भावाप्रमाणे काळजीपूर्वक ऐकायचा. त्याने मला कशासाठीही नाकारले नाही.” हे बोलताना नदीम पुन्हा भावनिक झाले होते.

९०च्या दशकात होता जलवा:
यशस्वी संगीतकार जोडी म्हणून नदीम-श्रवण यांनी ९०च्या दशकात अनेक हिट संगीत आणि अनेक शेकडो लोकप्रिय गाणी दिली आहेत. ही गाणी अजूनही रसिकांच्या जिभेवर आहेत. ९०च्या दशकात संगीतकार म्हणून नदीम-श्रवण इतके गाजले होते की, दर दुसर्‍या-तिसर्‍या चित्रपटात त्यांचे संगीत असायचे. जवळपास प्रत्येक निर्माता आणि दिग्दर्शक, त्यांच्या संगीताच्या जादूने आपल्या चित्रपटांना हिट करण्यासाठी उत्सुक असायचे. त्या दोघांचे संगीत असे होते की, त्यावेळी त्यांच्या संगीतमुळे बर्‍याच चित्रपटांनी बॉक्स आॅफिसवर धमाल केली होती. १९९० मध्ये रिलीझ झालेल्या ‘आशिकी’ चित्रपटाच्या सुपरहिट गाण्यांमुळे, नदीम-श्रवणचे नशिब कायमचे बदलले आणि यानंतर दोघांनीही मागे वळून नाही पाहिले.

‘या’ चित्रपटात दिलंय हिट संगीत:
नदीम-श्रवण जोडीने ‘आशिकी’, ‘साजन’, ‘सड़क’, ‘दिल है कि मानता नहीं’, ‘साथी’, ‘दीवाना’, ‘फूल और कांटे’, ‘हम हैं राही प्यार के’, ‘राजा हिंदुस्तानी’, ‘जान तेरे नाम’ ‘रंग’, ‘राजा’, ‘धड़कन’, ‘परदेस’, ‘दिलवाले’, ‘राज’, ‘अंदाज’, ‘बरसात’, ‘सिर्फ तुम’, ‘कसूर’, ‘बेवफा’ यांसारख्या चित्रपटात संगीत दिले. अशा बर्‍याच चित्रपटांमध्ये हिट संगीत देऊन, त्यांनी त्या काळात सर्वात यशस्वी आणि सर्वात महागडे संगीतकार म्हणून आपली ओळख निर्माण केली होती.

नदीम यांनी पुढे सांगितले की, लंडनमध्ये बरीच वर्षे असूनही ते श्रवणच्या संपर्कात होते आणि ते नेहमी त्यांना फोन करत असे. नदीम म्हणाले, “२०-२५ दिवसांपूर्वी माझे श्रवणशी फोनवर बोलणे झाले होते. त्या वेळी आम्ही खूप गप्पा मारल्या होत्या. लवकरच अमेरिकेत कॉन्सर्ट कारण्याबद्दलही बरीच चर्चा झाली होती. पण आम्ही पुन्हा भेटण्यापूर्वी आणि पुन्हा एकत्र काम करण्यापूर्वी तो मला कायमचा सोडून गेला.”

हे देखील वाचा