मलायका अरोरा आणि अरबाज खान यांची गणना एकेकाळी बॉलिवूडमधील सर्वात ग्लॅमरस आणि स्टाइलिश जोडप्यांमध्ये केली जायची. जेव्हा जेव्हा दोघे एकत्र दिसायचे, तेव्हा त्यांचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल व्हायचे. अरबाज आणि मलायका यांनी 1998 मध्ये लग्न केले. पण लग्नाच्या 19 वर्षांनंतर मलायका आणि अरबाज यांनी घटस्फोट घेऊन त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का दिला. या जोडप्याला एक मुलगा आहे, जो परदेशात शिकत आहे. आता मलायका आणि अरबाज क्वचितच एकत्र दिसतात. (malaika arora and arbaaz khan hated this habit of each other revealed once in interview)
पण आज आम्ही या दोघांच्या नात्यातील काही मनोरंजक गोष्टी तुम्हाला सांगणार आहे. खरंतर लग्न मोडण्याच्या काही वर्षापूर्वी, हे दोघे एका चॅट शोमध्ये दिसले होते. त्यांनी चॅट शोमध्ये एकमेकांबद्दल अनेक खुलासे केले होते. दोघांनी काही मजेदार गोष्टीही शेअर केल्या होत्या आणि एकमेकांचा राग आणणाऱ्या सवयी उघड केल्या होत्या.
मलायका अरोराने अरबाज खानबद्दल सांगितले होते की, तो खूप निष्काळजी व्यक्ती आहे. तो जिथून घरातील वस्तू घेतो, त्याला परत त्या जागी ठेवत नाही. त्यामुळे तिला त्रास व्हायचा. काळासोबत अरबाज खानची ही सवय वाढत असल्याचेही ती म्हणाली होती. तर अरबाज खान म्हटला होता की, मलायका तिच्या चुका कधी मान्य करत नाही. त्याला मलायकाची ही सवय अजिबात आवडत नसल्याचेही त्याने सांगितले होते.
सध्याच्या काळाबद्दल बोलायचं झालं, तर अरबाज खान सध्या जॉर्जिया एंड्रियानीसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. तसेच मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरही नेहमीच चर्चेत असतात. मलायका तिच्या फिटनेस रुटीन आणि शोमध्ये व्यस्त असते. तिचे वर्कआउट आणि जिमचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही नक्की वाचा-
मलायका अरोराने केला आवडत्या जोडीदाराचा खुलासा, पण अर्जुन कपूर नाहीये तो व्यक्ती!
‘मला सलमानने नाही बनवले, मी स्वतः…’ जेव्हा मलायका अरोराने चिडून दिले होते स्पष्टीकरण