Saturday, September 30, 2023

‘मला सलमानने नाही बनवले, मी स्वतः…’ जेव्हा मलायका अरोराने चिडून दिले होते स्पष्टीकरण

बॉलिवूडमधील टॉपची डान्सर असलेली अभिनेत्री म्हणजे मलायका अरोरा (Malaika Arora). मलायका तिच्या डान्ससोबतच तिच्या जबरदस्त फिटनेससाठी देखील ओळखली जाते. वयाची पंचेचाळीशी गाठूनही मलायका कमालीची फिट आहे. सध्या मलायका टेलिव्हिजनविश्वात अनेक रियॅलिटी शोमध्ये परीक्षकाच्या भूमिकेत दिसते. तिने तिच्या नृत्यकौशल्याच्या जोरावर इंडस्ट्रीमध्ये लोकप्रियता आणि प्रसिद्धी मिळवली आहे. मलायकाने जेवढी ओळख तिच्या व्यावसायिक आयुष्यासाठी मिळवली तेवढीच प्रसिद्धी तिने तिच्या वैयक्तिक आयुष्यासाठी देखील मिळवली आहे. तिचा डान्स हीच खरी तिची ओळख बनली आहे.

दिलसे चित्रपटातील छईयां-छईयां’ गाण्यात तिने शाहरुख खानसोबत डान्स केला आणि हे गाणे तुफान गाजले. किंबहुना आजही या गाण्याची क्रेझ जबरदस्त आहे. या गाण्यापासून मलायकाने कधीही मागे वळून पाहिले नाही. एकापेक्षा एक गाण्यात तिने तिचा डान्स सादर केला. ‘मुन्नी बदनाम’, ‘अनारकली डिस्को चली’, ‘ओठ रसिले’, ‘माही वे’, ‘अयोरे म्हारो ढोलना’ आदी गाण्यांमधून तिने लोकप्रियता मिळवली. तिला लोकांनी आयटम गर्ल म्हणून देखील संबोधले यासोबतच सलमान खानच्या भावाशी लग्न केल्यानंतर मलायका जास्त यशस्वी झाली असेही बोलण्यात येऊ लागले. मलायकाने 1998 साली सलमान खानचा लहान भाऊ असलेल्या अरबाज खानसोबत लग्न केले. मात्र लग्नाच्या 19 वर्षांनी त्यांचा घटस्फोट झाला.

मात्र मलायकाने स्वतः तिचे करिअर घडवल्याचे सांगितले. झाले असे की, ड्रामा क्वीन राखी सावंतने सांगितले की, मलायकाला तिचे सलमान खानसोबत कनेक्शन असल्यामुळे तिला ‘आयटम गर्ल’ म्हणून संबोधले जात नसल्याचे सांगितले होते. यावरच स्पष्टीकरण देताना मलायकाने सांगितले की, “या तत्वावरून तर मला सलमान खानच्या प्रत्येक सिनेमातील गाण्यात घेतले पाहिजे. सोबतच ज्या सिनेमात सलमान खान पाहुण्या कलाकाराची भूमिका करतो त्या सिनेमातही माझे गाणे पाहिजे. मला सलमान खानने तयार केले नसून, मी स्वतःच या इंडस्ट्रीमध्ये संघर्ष करून उभी आहे.”

मलायका आणि अरबाजचा घटस्फोट झाला असून आता ते दोघेही त्यांच्या आयुष्यात खुश आहे. त्यांना एक मुलगा असून, मुलासाठी ते अनेकदा एकत्र देखील दिसतात. सध्या मलायका आणि अर्जुन कपूर नात्यात असून अरबाज खान इटालियन मॉडल जॉर्जिया एंड्रियानीला (Giorgia Andriani) डेट करत आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा :
मलायका अरोराने अशाप्रकारे केला सांभाळले वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्य, मातृदिनी केला खुलासा
लहानपणी आई-वडिलांच्या घटस्फोटाचे दुःख सहन करणारी मलायका अरोरा म्हणाली, ‘माझे आयुष्य कधीच सोपे नव्हते’

हे देखील वाचा