Saturday, April 12, 2025
Home बॉलीवूड कपड्यांमुळे झाला मलायका आणि अरबाज खान यांचा घटस्फोट? खुद्द अरबाजने सांगितले खरे कारण

कपड्यांमुळे झाला मलायका आणि अरबाज खान यांचा घटस्फोट? खुद्द अरबाजने सांगितले खरे कारण

बॉलिवूडमधील सर्वात चर्चित घटस्फोट म्हणजे मलायका अरोरा आणि अरबाज खान यांचा. अनेक वर्षांचा त्याचा संसार त्यांनी मोडल्यानंतर सर्वच स्तरातून आश्चर्य व्यक्त झाले. त्यांच्या घटस्फोटानंतर सर्वांनीच त्यांचा घटस्फोट का झाला याचे अंदाज बांधायला सुरुवात केली. मात्र खरे कारण कधीच समोर आले नाही. सुंदर केमिस्ट्री असताना अचानक त्यांच्या या निर्णयाने सर्वांनाच हादरवून सोडले होते. आता त्यांच्या घटस्फोटाला अनेक वर्ष झाली असून, दोघेही आपापल्या आयुष्यात पुढे गेले असून, मलायका अरोरा आता अर्जुन कपूरला डेट करत आहे. दोघेही एकमेकांसोबत खुश असून, अनेकदा खास वेळ एकत्र घालवताना दिसतात.

अरबाज आणि मलायका यांची पहिली भेट ९० च्या दशकात झाली. एकमेकांना डेट केल्यानंतर १९९८ साली त्यांनी लग्न केले. दोघे एकमेकांसोबत तब्ब्ल १९ वर्ष होते. त्यानंतर ते वेगळे झाले. त्यानंतर अनेकांनी ते का वेगळे झाले याची कारणे सांगितली. अनेकांनी तर त्या दोघांचे नाते फॅशनमुळे आणि छोट्या कपड्यांमुळे वेगळे झाल्याचे सांगितले. मात्र अरबाजने सर्वच कारणे खोडून काढली. त्याने एका मुलाखतीमध्ये या घटस्फोटावर बोलताना सांगितले की, त्याने कधीच मलायकाला तिच्या कपड्यांबद्दल टोकले नाही.

अरबाज खान मुलखातीमध्ये म्हणाला, “मी कपड्यांसाठी कधीच तिला रोक टोक केली नाही. मी नेहमीच तिच्या काड्यांचे समर्थन केले. कारण मला माहित आहे की, एखाद्याला कोणत्या गोष्टीसाठी अडवले तर तो तेच करेल. म्हणूनच मी नेहमी तिला फॅशनबद्दल काही म्हटले नाही.” मात्र अजूनही त्यांच्यात घटस्फोट का झाले याचे खरे कारण समोर आले नाही. त्यांच्यात वैचारिक मतभेद असल्याचे सांगितले जाते.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
अमृता फडणवीसांच ‘मूड बना लिया’ गाण्याने घातलाय धुमाकूळ! पोस्ट शेअर करत म्हणाल्या, ‘जल्लोष संपण्याचं…,’
आदिलसोबत लग्नावर राखी सावंतने ट्रोलर्सला दिलं सडेतोड उत्तर; म्हणाली, ‘मी खूप….’

हे देखील वाचा