बॉलिवुडमधील आयटम गर्ल आणि सुप्रसिद्ध अभिनेत्री मलायका अरोरा गेल्या काही दिवसात आपल्या रियालिटी “शो मूविंग इन विद मलायका” यामुळे चर्चेत आली आहे.या शो चा पहीला भाग “डिज्नी पल्स हॉटस्टार” वर प्रदर्शित झाला आहे.ज्यात अभिनेत्री अरबाज खान यासोबत घटस्फोट आणि तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल फरहान खान सोबत मोकळेपणाने गप्पा मारताना पहायला मिळाली.
या शो मध्ये मलायका अरोरा (Malaika Arora) हिने सांगितले की, तिचा मुलगा अरहान अरोरा (Arhan Arora) याने हा शो करण्यासाठी तिला फार प्रोत्साहन दिले. सोबतच तिने सांगितले की, अर्जुन कपूर (Arjun Kapoor) हा नेहमीच तिला खुष ठेवत आला आहे. शो दरम्यान फराह खान (Farah Khan) हिने मलायकाला एक प्रश्न विचारला की, ‘तिच्या नात्या बद्दल बोलल्या जाणाऱ्या गोष्टींसोबत तु कशी डिल करतेस?’
यावर मलायका म्हणाली, “माझ्या साठी हे म्हणावे तितके सोपे न्हवते. मी रोज कोणत्या ना कोणत्या टिकांचा सामना करत असते. नेहमीच मी ऐकत आले आहे की, तु तर अर्जुन पेक्षा वयाने मोठी आहेस. पाहायचे झाले तर पुरुष हा नेहमी आपल्या पेक्षा 20/30 वर्षाने लहान असलेल्या स्त्रीला डेट करत असतो आणि याचे कौतुकही केली जाते. मात्र जर एखादी स्त्री आपल्या पेक्षा वयाने लहाण मुलाला डेट करत असेल तर तिला ट्रोल केलं जातं, तिला नावं ठेवले जातात.”
View this post on Instagram
मलायका पुढे म्हणते की, “तुम्ही ऐकूण हैराण व्हाल, पण यातील काही गोष्टी ह्या बाहेरच्या व्यक्तींनी नाही, तर माझ्याच माणसांनी पसरवल्या आहेत. जेवढं मला बाहेरच्या लोकांचा बोलण्याचा त्रास होत नाही, तेवढा आपल्या जवळच्या लोकांच्या बोलण्यामुळे होतो.
आपले बोलने पुढे चालु ठेवत फराह मलायकाला तिच्या पुढील आयुष्याबद्दल विचारते की, ‘पुन्हा तुला लग्न करायचे आहे का? पुन्हा मुलांचा विचार आहे का?’ असे विचारते. त्यावर उत्तर देत मलायका असे म्हणाली की, “या सर्व काल्पनिक गोष्टी आहेत. यावर आमचे बोलणे झाले असल्याचे खरे आहे, पण माझ्या म्हण्याप्रमाने जर आपण रिलेशनशिप मध्ये किंवा आपल्या पार्टनर सोबत असु तर अशा चर्चा या होतच राहतात. पण मला असे वाटते की, मी रिलेशनशिप मध्येच ठीक आहे.
आपले मत मांडत मलायका असे म्हणते की, “आजवर मी जे निर्णय घेत आले ते पुर्ण पणे माझ्या स्वत:च्या मर्जीने घेतले आहेत जेणे करुन मी खुष राहीण. बाकी जग दुनिया काहीही बोलू देत त्याचा मला फरक पडत नाही. याचा अर्थ असा आहे की तिला सध्या तरी लग्न करण्यामध्ये फारसा विश्वास नाही पण ती तिच्या नात्यामध्ये खूपच खुश आहे.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक वाचा-
फटाके वाजवा रे! कोटद्वार येथे उर्वशीच्या घरी लगीनघाई, अभिनेत्री रंगली हळदीच्या रंगात
राज कपूरांनी संधी देऊनही मागच्या दारातून हेमा मालिनीने ठोकली होती धूम! तरीही सिनेमा ठरला सुपरहिट