Friday, July 5, 2024

मलायकाला राग अनावर; CM शिंदेंना टॅग करत केली कारवाईची मागणी, काय आहे प्रकरण?

एका पाळीव श्वानाला क्लिनिकमध्ये बेदम मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ ठाण्यातील एका पाळीव प्राण्यांच्या दवाखान्यातील असल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंर नागरिकांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात असून अनेक सेलिब्रिटीदेखील संताप व्यक्त करत आहेत. अभिनेत्री मलायका अरोरानंदेखील कारवाईची मागणी केली आहे. मलायकाने थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टॅग करत दाद मागितली आहे.

ठाण्यातील आर मॉलजवळ असणाऱ्या वेटिक पेट क्लिनिकमध्ये एक संतापजनक प्रकार घडल्याचे समोर आले आहे. याठिकाणी ग्रुमिंगसाठी आणण्यात आलेल्या एका श्वानाला क्लिनिकमधील दोन कर्मचाऱ्यांनी अमानुष मारहाण केली. ही घटना 7 ते 8 फेब्रुवारीच्या दरम्यान घडलीय. या प्रकरणाचा व्हिडीओ समोर आल्यानंतर संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

मलायकानं इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या त्यामध्ये एक व्यक्ती श्वानाला मारताना दिसत आहे. तर पोलीस एका व्यक्तीला ताब्यात घेताना दिसत आहे, सोशल मीडियावरील पोस्टमध्ये मलायकानं संताप व्यक्त केला आहे. ,”मला आशा आहे की, तो कुत्रा ठीक असेल. मला खूप राग आला आहे, मला विश्वास आहे की, या प्रकरणाची कारवाई करण्यात आली असेल. त्या व्यक्तीला कठोर शिक्षा करण्याची वेळ आली आहे.” अशा आशयाची पोस्ट शेअर करत मलायकाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टॅग केलं आहे.

तसेच मलायकासोबत रितेश देशमुख, जुई गडकरी यांनीही संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. जेव्हा ठाण्यातील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला तेव्हा पीएडब्ल्यूएसचे पदाधिकारी, नीलेश भांगे आणि इतर काही जणांनी तक्रार दाखल केली, असे एका अधिकाऱ्याने पीटीआय या वृत्तसंस्थेला सांगितले आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

आमिरचा मुलगा जुनैद जपानमध्ये साई पल्लवीसोबत करतोय चित्रपटाचं शूटिंग? इनसाइड फोटो आले समोर
‘आर्टिकल 370’ नंतर यामी गौतम सिनेसृष्टीला ठोकणार राम राम; चर्चेला उधाण

 

हे देखील वाचा