Thursday, March 13, 2025
Home बॉलीवूड मलायका आणि अरबाजच्या घटस्फोटावर मुलगा अरहानची ‘अशी’ होती प्रतिक्रिया

मलायका आणि अरबाजच्या घटस्फोटावर मुलगा अरहानची ‘अशी’ होती प्रतिक्रिया

कोणतेही नाते तुटणे हे खूपच त्रासदायक असते. मग भलेही ते ब्रेकअप असो किंवा घटस्फोट. पण जेव्हा १८, २० वर्षांचे संसार मोडतात तेव्हा त्या दोन लोकांसाठी, त्यांच्या कुटुंबासाठी आणि इतरांसाठी नक्कीच हे धक्कादायक असते. एवढे वर्ष सोबत राहिल्यानंतर घटस्फोट घेणे हे फक्त अवघड नाही तर अशक्य देखील असते, आणि त्यात जर तुम्ही आईवडील असाल तर ही गोष्ट अधिक अवघड होऊन बसते. बॉलिवूडमध्ये आपण नेहमीच घटस्फोट आणि ब्रेकअप हे दोन शब्द ऐकत असतो. आतापर्यंत बॉलिवूडमध्ये अनेक मोठमोठे आणि धक्कादायक घटस्फोट झाले आहेत. यातलाच एक घटस्फोट म्हणजे मलायका अरोरा आणि अरबाज खान.

अरबाज आणि मलायका यांनी जवळपास १८ वर्षांचा संसार २०१७ साली मोडला आणि ते वेगळे झाले. जेव्हा मलायका आणि अरबाज वेगळे झाले तेव्हा ते एका मुलाचे अरहानचे आईबाबा होते. एका मुलाखतीमध्ये मलायकाने सांगितले की, जेव्हा त्यांच्या मुलाला या घटस्फोटाबद्दल समजले तेव्हा त्याची प्रतिक्रिया कशी होती.

मलायकाने सांगितले की, “मला माझ्या मुलाला त्याच्या वाढीसाठी पोषक आणि उत्तम वातावरण द्यायचे होते. मात्र त्याच्या आजूबाजूला खूपच निराश, तणावपूर्ण वातावरण होते. वेळेनुसार त्याने आमच्या निर्णयाचा स्वीकार केला. त्याने पहिले की, घटस्फोटानंतर आम्ही दोघे एक स्वतंत्र व्यक्ति म्हणून आनंदी आणि तणावविरहित आयुष्य जगायला सुरुवात केली. त्यानंतर माझ्या मुलाने मला सांगितले की, आई तुला हसताना आणि अधिक आनंदी पाहून मला खूप छान वाटत आहे. हे ऐकून मला खूपच रिलॅक्स वाटले.”

मलायका आणि अरबाज यांची पहिली भेट एका जाहिरातीच्या शूटिंग दरम्यान झाली. त्यानंतर त्यांनी एकमेकांना देत करायला सुरूवात केली आणि १९९९ साली लग्न केले. त्यानंतर ते अरहानेचे आईबाबा झाले. जवळपास १८ वर्ष एकमेकांसोबत घालवल्यानंतर अरबाज आणि मलायकाने २०१६ साली घटस्फोटासाठी अर्ज केला आणि २०१७ साली ते कायदेशीररित्या वेगळे झाले. अरहानेची कस्टडी कोर्टाने मलायकाकडे सोपवली आहे. सध्या अरहान त्याच्या पुढील शिक्षणासाठी परदेशात आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-किसिंग सीनमध्ये लारा दत्ताला नाही कोणतीही अडचण, सांगितली कशी होती पती महेश भूपतीची प्रतिक्रिया

-अतरंगी कथा असणाऱ्या आणि प्रेमाचा त्रिकोण दाखवणाऱ्या ‘अतरंगी रे’ सिनेमाचा धमाल ट्रेलर रिलीझ

-हाय गर्मी! मोनालिसाने मिनी स्कर्ट घालून केला जबरदस्त डान्स, ओलांडल्या बोल्डनेसच्या सर्व मर्यादा

हे देखील वाचा