बॉलिवूडची मुन्नी म्हणून प्रसिद्ध असलेल्या मलायका अरोरा हिला आजकाल कोण ओळखत नाही. मलायका ही आजमितीला बॉलिवूडची सर्वात फिट अभीनेत्री म्हणून ओळखली जाते. तसंच बॉलिवूडच्या टॉपच्या सौंदर्यवतींमध्येदेखील मलायकाचं नाव घेतलं जातं. परंतू आज आपण मलायकाबद्दल हे सर्व का बोलत आहोत तर त्याला कारणही तसंच आहे. सध्या सोशल मीडियावर मालायकाचे खूपच सुंदर आणि हॉट फोटोज व्हायरल होत आहेत.
रविवारी मलायकाने हॅलो संडे या कॅप्शनसह एक पांढऱ्या रंगातील ड्रेस घातलेला फोटो पोस्ट केला होता. ज्यात ती खूपच सुंदर दिसत आहे परंतु तिने घातलेले सोन्याचे स्टायलिश कानातले आणि ओठांवरील लाल रंगाचं लिपस्टिक हे तिच्या या मादक सौंदर्यावर चार चांद लावत आहे. तिच्या या फोटोला जवळपास साडे सहा लाखांहून अधिक लाईक्स तर साडे पाच हजाराहून अधिक लोकांनी या फोटोवर प्रतिक्रिया दिल्या आहेत.यातील एकाने तर मलायकला अर्जुन कपूरबद्दल विचारणा केली. अद्यापही मलायकाने या प्रतिक्रियेला काहीही उत्तरं दिलेलं नाही. यावर ती उत्तर देईल की नाही याची मात्र चाहते आतुरतेने वाट पाहत असतील.
मलायकाचं हे जे सौंदर्य आपण पाहतो आहोत हे मेंटेन ठेवण्यासाठी मलायका तितकीच मेहनत देखील घेत असते. रोज पहाटे उठून जॉगिंगला जाणं, घरी आल्यावर व्यवस्थित योगा करणं या सर्व क्रिया ती करत असते. त्यामुळे ऐन चाळिशीतही मलायका आपल्याला एखाद्या विशी-पंचवीशीतल्या तरुणी सारखी दिसते.
आपल्या सर्वानाच ठाऊक आहे की मलायका ही सध्या अर्जुन कपूर सोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत आहे. या आधी तिचा विवाह सलमानचा भाऊ अरबाज खान याच्यासोबत झाला होता. लग्नाच्या १७ते १८ वर्षांनंतर २०१७ ला या दोघांनीही घटस्फोट घेऊन वेगळं होण्याचा निर्णय घेतला आणि आता दोघेही आपआपल्या वैयक्तिक आयुष्यात आनंदात आहेत. मलायकाने याआधी सलमानच्या दबंग चित्रपटात ‘मुन्नी बदनाम हुई’ या आयटम सॉंगवर डान्स केला होता आणि गेले काही दिवस ती इंडियाझ बेस्ट डान्सर या कार्यक्रमात परीक्षण देखील करताना दिसली होती