Friday, October 17, 2025
Home अन्य भारीच ना! ‘बिग बॉस ओटीटी’च्या शुभारंभास मलायका अरोरा लावणार हॉटनेसचा तडका; पाहा तिच्या डान्सची झलक

भारीच ना! ‘बिग बॉस ओटीटी’च्या शुभारंभास मलायका अरोरा लावणार हॉटनेसचा तडका; पाहा तिच्या डान्सची झलक

आज ८ ऑगस्ट पासून ‘बिग बॉस’च्या ओटीटी पर्वाचा शुभारंभ होत आहे. ओटीटीवर पहिल्यांदाच बिग बॉस पाहता येणार असल्याने सर्व लोकांमध्ये जरा जास्तच उत्सुकता आहे. त्यातही पहिल्यांदा सर्वाना २४ तास बिग बॉस पाहता येणार असल्याने बिग बॉसच्या चाहत्यांमध्ये एक वेगळीच क्रेझ आहे. नेहमी टीव्हीवर एक तासापुरता दिसणारे बिग बॉस आता २४ तास बघता येणार ही कल्पनाच बिग बॉस फॅन्सला सुखावणारी आहे. या बिग बॉसची सुरुवात धडाकेबाज करण्यासाठी अनेक कलाकार त्यांच्या परफॉर्मन्सचा तडका या ग्रँड ओपनिंगच्या कार्यक्रमाला लावणार आहे.

यामध्ये बॉलिवूडची ‘फिटनेस क्वीन’ म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री मलायका अरोराचा देखील समावेश आहे. मलायका तिच्या दमदार परफॉर्मन्सने स्टेजवर आग लावण्यासाठी सज्ज झाली आहे. मलायका बॉलिवूडमधील अनेक हिट नंबर्सवर डान्स करताना दिसणार आहे. तिच्या डान्सची एक झलक मेकर्सने सोशल मीडियावर शेअर केली आहे. यामध्ये ती ‘मिमी’ सिनेमातील ‘परमसुंदरी’ गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये मलाईकाचा हॉट लूक सगळ्यांच्याच चर्चेचा विषय बनला आहे. प्रेक्षकांना मलायका बऱ्याच दिवसांनी स्टेजवर डान्स करताना पाहायला मिळणार आहे.

अर्जुन बिजलानी, उर्फी जावेद, नेहा भसीन, जीशान खान, करण नाथ, रिद्धिमा पंडित, दिव्या अग्रवाल, मिलिंद गाबा, सीमा तपारिया, शमिता शेट्टी, अक्षरा सिंग, राकेश बापट, नेहा मलिक, पवित्रा लक्ष्मी, प्रतीक सेहजपाल आदी कलाकार आपल्याला या बिग बॉसच्या घरात पाहता येणार आहे. तसे पाहिले तर यातील बऱ्याच कलाकारांची नावे अजूनही गुलदस्त्यातच ठेवण्यात आली आहे. मात्र प्राप्त माहितीनुसार ही सर्व मंडळी या घरात जाणार, हे नक्की असल्याचे बोलले जात आहे. बिग बॉस ओटीटीच्या निमित्ताने पहिल्यांदाच करण जोहर बिग बॉसच्या सूत्रसंचालकच्या रूपात दिसणार आहे. आता करण जोहरच्या येण्यामुळे या शोमध्ये नक्की काय काय होते, हे बघणे नक्कीच असूक्त्याचे ठरणार आहे. अधिक बोल्डनेस, अधिक वाद, मोठे आणि कठीण टास्क आपण बघणार हे नक्की.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-इंडियन आयडलच्या ‘या’ स्पर्धकाचे फळफळले नशीब, करण जोहरकडून मिळाली थेट ‘धर्मा’साठी गाणी गाण्याची संधी

-अफेअरच्या चर्चांमध्ये सिद्धार्थ मल्होत्राने कियाराला रस्त्यावरच घेतले उचलुन, पुढे जे झाले…

-रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर घरी बेडरेस्टवर आहे नुसरत भरुचा; ‘या’ कारणामुळे अचानक बिघडली होती तब्येत

हे देखील वाचा