Saturday, October 18, 2025
Home बॉलीवूड ‘डान्सर दिवा’मलायका अरोरा इंडस्ट्रीपासून का आहे लांब ? अभिनेत्रीने सांगितले ‘हे’ कारण

‘डान्सर दिवा’मलायका अरोरा इंडस्ट्रीपासून का आहे लांब ? अभिनेत्रीने सांगितले ‘हे’ कारण

डांन्सर दिवा म्हणून ओळखली जाणारी मलायका अरोरा आपल्या चित्रपटांपेक्षा वैयक्तीक आयुष्यासाठी जास्त ओळखली जाते. तिच्या आणि अरबाज खान यांच्या जोडीने 18 वर्षाचा संसार तोडून दोघेही आपल्या आयुष्यामध्ये खूपच खुश आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये ती आणि अर्जुन कपूर यासोबत नात्यामध्ये असल्यामुळे अनेक ठिकाणी या दोघांच्या जोडीली स्पॉट करण्यात आले होते, मध्ये तर यांच्या लग्नाच्याही बातम्या आल्या होत्या. मलाइक आपल्या फिटनेसने आणि बोल्ड लुकने चाहत्यांचे लक्ष वेधत असते. ती सोशल मीडियीवर नेहमी सक्रिय असून तिचा मोठा चाहतावर्ग आहे.

मलायका अरोरा अपल्या फॅशनमुळे नेहमी लोकांचे लक्ष वेधत असते. तिच्या डान्सचे आजही लाखो चाहते आहेत. तिचे वय जरी जास्त असले तरी ती तरुन अभिनेत्रींपेक्षा सुंदर दिसण्यात एक पाऊल पुढे आहे. अभिनेत्री एवढी प्रसिद्ध असली तरी तिने आजपर्यत कोणत्याच चित्रपटामध्ये प्रमुख भुमिका केली नाही. त्यामुळे एका मुलाखतीत तिने याबद्दल आपले मत व्यक्त केले आहे.

मलायकाने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीमध्ये तिने आपल्या अभिनयाविषयी वक्तव्य केले आहे. 12 वर्षापासून ती अभिनय क्षेत्रात सक्रिय नसल्याचे दिसून येत आहे. मात्र, तिने आजपर्यत प्रमुख भुमिकाही स्वीकरली नाही असा प्रश्न तिला मुलाखतीदरम्यान विचारण्यात आले तेव्हा तिने सांगितले की, “मला प्रमुख भूमिकेसाठी अनेक संधी मिळाल्या होत्या, पण मला ते पात्र फार काही भावले नाही. त्यामुळे मी त्या भूमिका स्वारल्या नाहीत.” त्यामुळे मला या गोष्टीची खूप खंत वाटते. पण जर येत्या काळात मला संधी मिळाली तर मी नक्कीच करेल, कोणतीही गोष्ट कधीच नकारु नये असे मला वाटते.”

मलायका पुढे म्हणाली, देवाच्या कृपेने मला अनेक संधी मिळत आहेत, जर मला खरोखरच एक रोमांचक भूमिका मिळाली तर मी ती संधी कधीच सोडणार नाही. यानंतर तिला प्रश्न विचारला की, तुला डान्स आवडत आहे, जर तुला आगामी काळात डान्सरचा चित्रपट मिळाला तर तु करशील का? यावर अभिनेत्रीने उत्तर देत सांगितले की, मला या बाबतीत काहीच माहीत नाही, काहीही होऊ शकते. मी ज्या प्रकारची व्यक्ती आहे त्यापेक्षा वेगळ्या भूमिकाही करु शकते.

मलायका अरोराने आपल्या अभिनयाची सुरुवात 20 वर्षाची असतानाच केली होती. तिने ‘दिल से’ या चित्रपटातून ‘छैया छैया’ या गण्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. या गाण्याने तिला अमाप प्रसिद्धी मिळवून दिली होती, यानंतर तिने ‘रंगीलो मारो ढोलना’, ‘मुन्नी बदनाम हुई’ असे अनेक आयटम गाण्यामध्ये ती थिरकली आहे. याशिवाय तिने 2010 मध्ये तिने ‘हाऊसफुल’ आणि 2014 मध्ये आलेल्या ‘हॅुपी न्यू इयर’ चित्रपटात पाहुणी कलाकर म्हणून काम केले आहे.

मलायकाने वयाच्या 20 व्या वर्षी काम करायला सुरुवात केली आणि ‘दिल से’ चित्रपटातील ‘छैया-छैया’ गाण्याने ती एका रात्रीतून स्टार झाली. त्यानंतर तिने ‘रंगीलो मारो ढोलना’, ‘मुन्नी बदनाम हुई’सह अनेक डान्स नंबरमध्ये काम केले. मलायकाने अभिनेत्री-निर्माती म्हणून इंडस्ट्रीत काम केले आहे. मलायका शेवटची 2010 मध्ये आलेल्या ‘हाऊसफुल’ चित्रपटात अभिनेत्री म्हणून दिसली होती. याशिवाय तिने 2014 मध्ये आलेल्या ‘हॅपी न्यू इयर’ चित्रपटात कॅमिओ केला होता.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक कर
हेही वाचा-
कोण आहे हा अभिनेता? एकेकाळी रामायणात ‘लव’ची भूमिका साकारणारा, आज आहे चित्रपटसृष्टीचा आघाडी कलाकार
‘अनुपमा’ उतरत्या वयात हाेणार आई? पाहा भन्नाट व्हिडिओ

हे देखील वाचा