Tuesday, January 14, 2025
Home बॉलीवूड शर्टलेस मिलिंद सोमण यांना पाहून स्वत:ला रोखू शकली नाही मलायका अरोरा, केलं ‘अस्सं’ काही

शर्टलेस मिलिंद सोमण यांना पाहून स्वत:ला रोखू शकली नाही मलायका अरोरा, केलं ‘अस्सं’ काही

मलायका अरोरा आणि मिलिंद सोमण हे दोघेही ‘फिटनेस फ्रिक’ असण्यासोबतच, सोशल मीडियावर देखील खूप सक्रिय असतात. दोघेही सतत नवनवीन पोस्ट शेअर करतात. दोघेही फिटनेस फ्रिक असल्यामुळे, फिटनेसशी संबंधित अनेक फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असतात. शिवाय आजकाल ते दोघे एकत्र कामही करत आहेत. ‘इंडियाज नेक्स्ट टॉप मॉडेल’ या शोमध्ये दोघे एकत्र पाहायला मिळतात. मलायका आणि मिलिंद या प्रसिद्ध मॉडेलिंग शोचे जज आहेत. अनुशा दांडेकरही या दोघांसोबत या शोचा एक भाग आहे. 

मिलिंद यांनी दाखवला ‘मेड इन इंडिया’ लूक
दरम्यान मलायका अरोरा आणि मिलिंद सोमण यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. मिलिंद सोमण यांनी स्वत: त्यांच्या इंस्टाग्राम हँडलवरून हा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये मिलिंद शर्टलेस दिसत आहेत. तर ते धोतर घालून रॅम्प वॉक करत आहेत. मिलिंद सोमण अभिनित सुपरहिट गाणे ‘मेड इन इंडिया’ व्हिडिओच्या बॅकग्राउंडमध्ये वाजत आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही मिलिंद यांची हॉटनेस सहज पाहू शकता. (malaika arora was not able to control herself after watching milind soman shirtless shouted loud)

मलायका अरोरा करू शकली नाही स्वत:ला कंट्रोल
मिलिंद सोमण यांची सुपर हॉट बॉडी आणि वॉक पाहिल्यानंतर मलायका अरोरा देखील स्वत: ला रोखू शकली नाही आणि जोरजोरात हूटिंग करू लागली. तिच्यासोबत अनुषा दांडेकर आणि इतर स्पर्धकही ओरडताना दिसले. यावेळी मिलिंद सोमण आपल्या स्टाईलने सर्वांना घायाळ करत होते, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. या व्हिडिओमध्ये तुम्ही मलायकाचा उत्साह पाहू शकता.

हॉटनेस पाहून पत्नीही झाली फिदा
इंस्टाग्रामवर हा व्हिडिओ शेअर करत मिलिंद सोमण यांनी कॅप्शनमध्ये लिहिलंय की, “आणि २६ वर्षांनंतर … पुन्हा एकदा…’ मिलिंद यांची पत्नी अंकिता कंवरनेही हा व्हिडिओ पाहिल्यानंतर यावर कमेंट केली आहे. तिने कमेंटमध्ये लिहिले की, “तुम्ही नेहमी इतके हॉट दिसता, हे कसे काय कायदेशीर असू शकते!” शिवाय या व्हिडिओवर मोठ्या प्रमाणात  कमेंट्स आणि लाइक्स येत आहेत. चाहते हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा पाहत आहेत.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-जेव्हा महेश भट्ट यांना समजवण्यासाठी नग्नावस्थेत रस्त्यावर धावल्या होत्या परवीन बाबी, मग पुढे…

-Netflix TUDUM: माधुरी दीक्षितचा डिजिटल डेब्यू, तर ‘अरण्यक’च्या धमाक्यासह ‘या’ प्रोजेक्ट्सची झाली घोषणा

-सिनेमागृह सुरू करण्यास शासनाचा हिरवा कंदील, तरीही ‘लाल सिंग चड्ढा’ प्रदर्शनाची तारीख लांबणीवरच

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा