Friday, May 24, 2024

प्रसिद्ध दिग्दर्शकाचे अन्नातून विषबाधा झाल्याने निधन, सिनेसृष्टीत पसरली शाेककळा

मल्याळम दिग्दर्शक आणि निर्मिती कार्यकारी बैजू परावूर यांचे निधन झाले आहे. त्यांचे वय 42 वर्षे होते. चित्रपट निर्मात्याचा मृत्यू अन्नातून विषबाधा झाल्यामुळे झाल्याचे कुटुंबीयांनी सांगितले. बैजू यांच्या निधनाने त्यांचे चाहते आणि मित्र हादरले असून त्यांनी शोक व्यक्त केला आहे.

माध्यमातील वृत्तानुसार, बैजू परावूर (baiju paravoor) एका चित्रपटावर चर्चा करण्यासाठी कोझिकोडमध्ये होते. अशात शनिवारी कारने घरी परतत असताना त्यांनी हॉटेलमध्ये जेवण केले, पण हॉटेलमधून बाहेर पडल्यानंतर लगेचच त्याला खूप अस्वस्थ वाटू लागले. त्यामुळे बैजू यांनी कुन्नमकुलम येथील घरी जाण्याचा निर्णय घेतला. सासरच्या घरी गेल्यानंतर त्यांची प्रकृती अधिकच बिघडली. त्यानंतर त्यांना जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, तेथेही त्यांचा त्रास कमी झाला नाही आणि ते रविवारी आपल्या घरी परतले.

बैजू यांच्या प्रकृतीत कोणतीही सुधारणा न झाल्याने त्यांच्यावर कुझुपिल्ली येथील रुग्णालयात उपचार करण्यात आले. रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांची प्रकृती अधिकच बिघडल्याने त्यांना तातडीने कोची येथील रुग्णालयात हलवण्यात आले.  मात्र, सोमवारी (26 जुन)ला पहाटे त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी चित्रा आणि त्यांची मुले आराध्या आणि आरव असा परिवार आहे. सोमवारी सायंकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आला.

दोन दशकांपासून चित्रपटसृष्टीत सक्रिय असलेल्या बैजू यांनी प्रॉडक्शन एक्झिक्युटिव्ह म्हणूनही काम केले. त्यांनी ‘धनियम’ आणि ‘कथोलचथन’ यासह 45 चित्रपटांमध्ये निर्मिती नियंत्रक म्हणून काम केले. गेल्या काही दिवसांपासून बैजू परावूर हे स्वत: लिहिलेल्या आणि दिग्दर्शित केलेल्या ‘सिक्रेट’ चित्रपटाच्या प्रदर्शनाची तयारी करत होते. दिग्दर्शक म्हणून त्यांचा हा पहिलाच चित्रपट होता. ‘सिक्रेट’ पुढील महिन्यात रिलीज हाेणार आहे.(malayalam director baiju paravoor died at the age of 42 his first film secret was to be released next month )

अधिक वाचा- 
अभिनेत्री कुशा कपिलाने केली घटस्फोटाची घोषणा; म्हणाली, ‘हे नात टिकवण्यासाठी ..’
Birthday | आरजेची नोकरी सोडून बनली यूट्यूबर, ‘असा’ मिळाला प्राजक्ता कोळीला बॉलिवूडमधील मोठा चित्रपट

हे देखील वाचा