Friday, April 3, 2026
Home साऊथ सिनेमा मल्याळम चित्रपटसृष्टीतील दोन प्रसिद्ध दिग्दर्शकांना अटक, पोलिसांनी जप्त केला हायब्रिड गांजा

मल्याळम चित्रपटसृष्टीतील दोन प्रसिद्ध दिग्दर्शकांना अटक, पोलिसांनी जप्त केला हायब्रिड गांजा

केरळ पोलिसांच्या उत्पादन शुल्क पथकाने कोची येथील एका मोठ्या कारवाईत प्रसिद्ध मल्याळम चित्रपट दिग्दर्शक खालिद रहमान आणि अशरफ हमजा यांना अटक केली. त्याच्यासोबत त्याचा मित्र शालिफ मोहम्मद यालाही अटक करण्यात आली. पोलिसांनी त्यांच्याकडून १.६ ग्रॅम हायब्रिड गांजा जप्त केला. कोची येथील सिनेमॅटोग्राफर समीर थाहिर यांनी भाड्याने घेतलेल्या फ्लॅटवर पहाटे २ वाजता छापा टाकण्यात आला.

माध्यमातील वृत्तानुसार, पोलिसांना कोची येथील पूर्वा ग्रँडबे येथील फ्लॅट क्रमांक ५०६ मध्ये गांजा ठेवल्याची माहिती मिळाली होती. उत्पादन शुल्क विभागाच्या विशेष पथकाने तात्काळ कारवाई केली आणि छाप्यादरम्यान, गांजा वापरण्याच्या तयारीत असताना तिघांना पकडले. याबद्दल एका अधिकाऱ्याने सांगितले की, “आम्ही तिघांना ताब्यात घेतले आहे आणि त्यांच्याकडून हायब्रिड गांजा जप्त केला आहे. चौकशीदरम्यान असे आढळून आले की हे लोक बराच काळ गांजा वापरत होते.”

पोलिसांनी तिघांविरुद्ध नार्कोटिक ड्रग्ज अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस (एनडीपीएस) कायदा, १९८५ च्या कलम २०(ब)(२)अ आणि २९ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. अधिकाऱ्याने असेही सांगितले की, फ्लॅटच्या मालकाची माहिती अद्याप गोळा केली जात आहे.

खालिद रहमान हे मल्याळम चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय दिग्दर्शक आहेत, ज्यांनी ‘अनुराग करिकिन्वेलम’, ‘उंडा’ आणि ‘थल्लुमाला’ सारखे उत्कृष्ट चित्रपट दिले आहेत. त्यांचा नवीनतम चित्रपट ‘अलाप्पुझा जिमखाना’ सध्या थिएटरमध्ये धुमाकूळ घालत आहे. तर, अशरफ हमजा ‘तमाशा’ आणि ‘भीमंते वाढी’ सारख्या चित्रपटांसाठी ओळखला जातो.

गेल्या काही आठवड्यात मल्याळम चित्रपट उद्योगात समोर आलेला हा दुसरा मोठा ड्रग्जशी संबंधित खटला आहे. काही काळापूर्वी, अभिनेता शाईन टॉम चाको ड्रग्ज छाप्यादरम्यान त्याच हॉटेलमधून पळून जाताना दिसला होता. नंतर त्याला अटक करण्यात आली पण त्याच दिवशी जामीन मिळाला.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

हेही वाचा

श्रुती हासनने नात्यांबद्दल केला खुलासा; म्हणाली, ‘मी काही लोकांना दुखावले आहे…’
नातेसंबंधातील फसवणूकीवर बोलली सई ताम्हणकर; तुमच्या पार्टनरला सांगण्याचे धाडस तरी ठेवा…

हे देखील वाचा