Wednesday, July 3, 2024

‘मालगुडी डेज’मधील स्वामी आता दिसतो ‘असा’; ओळखणेही झाले कठीण, पाहा फोटो

एखादी मालिका कितीही वर्षांपूर्वीची असली, तरी देखील प्रेक्षकांच्या ती आठवणीत असते. कारण त्या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात खास जागा निर्माण केलेली असते. त्याचप्रमाणे ‘मालगुडी डेज’ या मालिकेचे नाव तुम्हाला आठवत असेलच. हे नाव ऐकल्यावर एकच नाव मनात येते आणि ते म्हणजे स्वामी. स्वामी आणि त्याच्या मित्रांनी मालिकेत उत्तम अभिनय करून प्रेक्षकांची मने कशी जिंकली होती. आजही ‘मालगुडी डेज’मध्ये फक्त स्वामी आणि त्याच्या मित्रांचेच एपिसोड्स सर्वाधिक दिसतात. या मालिकेत धोती कुर्ता परिधान केलेल्या ८ वर्षाच्या मुलाने स्वामी (मालगुडी डेज स्वामी) प्रेक्षकांच्या मनावर वेगळी छाप सोडली आहे. स्वामीची भूमिका अभिनेता मास्टर मंजुनाथने केली होती आणि आता ते बंगळुरूमध्ये आपल्या कुटुंबासह स्थायिक झाले आहेत.

आजही चाहत्यांना हे जाणून घ्यायचे आहे की, ‘मालगुडी डेज’चा स्वामी आता कसा दिसतो आणि आता कुठे आहे. स्वामी उर्फ ​​मास्टर मंजुनाथचे अनेक लेटेस्ट फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. ज्यामध्ये तो आता खूपच मॅच्युअर आणि हँडसम दिसत आहेत. मास्टर मंजुनाथच्याबद्दल अनेक बातम्यांमध्ये असे सांगण्यात आले आहे की, तो आता बंगळुरूमधील एका आयटी कंपनीत पीआर सल्लागार आहे. अनेक चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केल्यानंतर तो आता आयटी कंपनीत काम करत असून खूप आनंदी आहेत.

Photo Courtesy: Instagram/ultramalgudidays

‘मालगुडी डेज’चा स्वामी उर्फ ​​मास्टर मंजुनाथने वयाच्या अवघ्या तिसऱ्या वर्षी अभिनयाला सुरुवात केली. त्याने कन्नड, तेलुगू आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम केले. पण त्याला सर्वाधिक लोकप्रियता ‘मालगुडी डेज’मधील स्वामीच्या भूमिकेतून मिळाली.

मास्टर मंजुनाथ याने नंतर अमिताभ बच्चन आणि मिथुन चक्रवर्ती यांच्या ‘अग्निपथ’ चित्रपटात काम केले. त्याच्याबद्दल असे म्हटले जाते की, वयाच्या अवघ्या १९ व्या वर्षी त्याने अभिनयाला अलविदा केले आणि अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्यास सुरुवात केली. आता त्याची पत्नी आणि मूलही त्यांच्या कुटुंबात आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हे देखील वाचा