Friday, July 5, 2024

‘गोल्डन बॉय’ नीरजसाठी मुलींनी केला ‘उड़े जब जब जुल्फे तेरी’ गाण्यावर भन्नाट डान्स; पुरता लाजला ऑलिंपियन

टोकियो ऑलिंपिक्स २०२०मध्ये नीरज चोप्राने सुवर्णपदक जिंकले. त्याने ही सुवर्ण कामगिरी केल्यानंतर सर्व क्षेत्रातून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव झाला होता. तसेच अनेकांनी त्याच्यावर बक्षिसांची मोठी खैरातही केली. टोकियोवरून घरी परतल्यानंतर नीरज अनेक सत्कार समारंभामध्ये व्यस्त होता. याचदरम्यान रेडिओ जॉकी (आर जे) मलिष्काने त्याची मुलाखत घेतली.

यावेळी मलिष्का व तिच्या इतर महिला सहकाऱ्यांनी नीरजसाठी ‘उड़े जब जब जुल्फें तेरी’ या गाण्यावर डान्स केला. यावेळी त्यांचा डान्स पाहून नीरज पुरता लाजला होता. मलिष्काने त्याला नंतर विचारले, “आम्ही जास्त तर छेडले नाही ना?” यावर प्रत्युत्तर देताना तो हसला आणि “नाही, धन्यवाद,” असे म्हणाला. (Malishka dance with Girls on ‘Ude Jab Jab Zulfen Teri’ for Neeraj Chopra)

नीरजने भालाफेक या खेळात सुवर्णपदक जिंकले आहे. त्यामुळे अनेक मुली त्याच्या चाहत्या झाल्या आहेत. त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवरील फॉलोवर्स देखील प्रचंड वाढले आहेत. विशेष म्हणजे यामध्ये मुलींची संख्या जास्त आहे.

आर जे मलिष्काबरोबरचा त्याचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये मलिष्का त्याला कार्यक्रमात “एक जादू की झप्पी चाहिये,” असं म्हणते. त्यावर नीरज हसत “लांबूनच नमस्कार,” असं म्हणतो व दोघेही हसू लागतात.

नीरजने वयाच्या अवघ्या २३ व्या वर्षी ही कामगिरी केली आहे. त्याच्या अनेक मुलाखतींमध्ये त्याला त्याच्या गर्लफ्रेंड व लग्नाविषयी विचारले, तर तो खूप लाजतो. तसेच सगळ्यांना तो “मला कोणतीच गर्लफ्रेंड नाही आणि लग्नाचा मी अजून विचारही केला नाही,” असे सांगतो. नीरजला सध्या त्याचे पूर्ण लक्ष खेळांवरच केंद्रित करायचे आहे. त्याला आगामी एशियन गेम्स, विश्व चॅम्पियनशिप आणि ऑलिंपिक टुर्नामेंटमध्ये महत्त्वपूर्ण कामगिरी करायची आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-सोनाली कुलकर्णीने ‘बैरागी…बैरागी का सूती चोला…ओढ़के चली…’ म्हणत सोशल मीडियावर घातला धुमाकूळ

-अंतरा मारवाहच्या डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमाला संपूर्ण कपूर कुटुंबाची हजेरी, कपूर सिस्टर्सने केली धमाल

-नलूच्या शालूमुळे मालिकेची पोलखोल, ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ मालिकेच्या सीनमध्ये झाली मोठी चूक

हे देखील वाचा