Friday, July 5, 2024

वर्षाच्या शेवटच्या दिवशी बोल्ड झाली मल्लिका शेरावत, बिकिनी घालून खुर्चीवर दिल्या हॉट पोझ!

बॉलिवूड अभिनेत्री मल्लिका शेरावतने (Mallika Sherawat) ‘मर्डर’ चित्रपटात इमरान हाश्मीसोबत बोल्ड सीन देऊन सर्वांना चकित केले होते. ती खऱ्या आयुष्यातही खूप बोल्ड आहे. याचा पुरावा म्हणजेच तिचे इंस्टाग्राम अकाउंट. आता मल्लिका शेरावतने २०२१ च्या शेवटच्या दिवशी असा एक फोटो पोस्ट केला आहे, जो इंटरनेटवर आगीसारखा पसरत आहे. 

बिकिनी घालून वाढवला इंटरनेटचा पारा
यात तुम्ही पाहू शकता की, मल्लिका शेरावत बिकिनी परिधान करून आरामात खुर्चीवर बसून उन्हाचा आनंद घेत आहे. तिचा हा फोटो पाहून चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढले आहेत, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. मल्लिकाची बोल्ड स्टाईल चाहत्यांना घायाळ करत आहे. कमेंट सेक्शनमध्ये चाहते अभिनेत्रीचे भरभरून कौतुक करताना दिसत आहेत. कदाचित यामुळेच फोटोवर प्रचंड लाइक आणि शेअर केले जात आहे. (mallika sherawat raise temperature in bikini photo goes)

हा फोटो इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर करत मल्लिका शेरावतने कॅप्शनमध्ये लिहिले की, “२०२१ चा शेवटचा दिवस. माझ्या इंस्टा कुटुंबाला नवीन वर्ष खूप छान जावो.” या पोस्टवर कमेंट करताना एका चाहत्याने लिहिले की, “तू खूप हॉट दिसत आहेस.” दुसर्‍याने कमेंट केली, “हॉट गॉर्जियस ब्युटी.” त्याचवेळी इतर चाहते कमेंट सेक्शनमध्ये फायर इमोजी शेअर करत आहेत.

मल्लिका शेरावतचे चित्रपट
वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, मल्लिका शेरावत शेवटची २०१९ मध्ये ‘बू सबकी फटेगी’ या वेब सीरिजमध्ये दिसली होती. फरहाद सामजी दिग्दर्शित हा एक हॉरर-कॉमेडी चित्रपट होता. रिपोर्ट्सनुसार, मल्लिका लवकरच साऊथ फिल्म इंडस्ट्रीत पदार्पण करणार आहे. ती ‘नागमति’ या पिरियड-ड्रामा चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट हिंदी व्यतिरिक्त तेलुगू आणि तमिळ भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

हेही वाचा-

हेही पाहा-

हे देखील वाचा