बोल्ड स्टाइल आणि स्पष्टवक्तेपणासाठी ओळखली जाणारी अभिनेत्री मल्लिका शेरावतने (Mallika Sherawat) ‘कास्टिंग काउच’वर अनेकदा आपले मत मांडले आहे, स्वतःचे अनुभव शेअर केले आहेत. पुन्हा एकदा मल्लिका शेरावतने कास्टिंग काउचबाबत मोठा खुलासा केला आहे. कास्टिंग काउचमुळे तिच्या करिअरवर परिणाम झाल्याची कबुली मल्लिकाने एका मुलाखतीत दिली.
मल्लिका सांगते की, तिने तडजोड करण्यास नकार दिल्याने ए लिस्टमधील सर्व कलाकारांनी तिच्यासोबत काम करण्यास नकार दिला. अभिनेत्री म्हणते की, “हे स्पष्ट आहे की, त्या लोकांना अशा अभिनेत्री आवडतात ज्या त्यांच्याशी तडजोड करण्यास तयार आहेत. मी त्यांच्यापैकी नाही. माझे व्यक्तिमत्व तसे नाही. मला स्वतःला कोणाच्याही हाती सोपवायचे नाही.” (mallika sherawat reveals why list heroes refused to work with her)
तडजोड म्हणजे काय हे स्पष्ट करताना मल्लिका पुढे सांगते की, “तो म्हणतो तेव्हा बसा, तो म्हणतो तेव्हा उभे राहा. पहाटे तीन वाजता हिरोने तुम्हाला त्याच्या घरी बोलावले तर तुम्हाला जावे लागेल. जर तुम्ही त्या गटात नसाल, तुम्ही त्याच्यासोबत चित्रपट करत असाल आणि तुम्ही त्याच्या आमंत्रणावर जाण्यास नकार दिला, तर तुम्हाला त्या चित्रपटातून बाहेर काढले जाईल.”
मल्लिकाने २००४ मध्ये ‘मर्डर’ या चित्रपटातून आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात केली. पण हळूहळू तिने हिंदी चित्रपट करणे बंद केले. जेव्हा तिला याचे कारण विचारण्यात आले, तेव्हा तिने सांगितले की, “मी माझे सर्वोत्तम दिले. मी चांगल्या भूमिका शोधण्याचा प्रयत्न केला. आपल्या सर्वांप्रमाणे माझ्याही काही चुका झाल्या आहेत. काही भूमिका चांगल्या होत्या, काही इतक्या चांगल्या नव्हत्या. हा सर्व एका अभिनेत्याच्या प्रवासाचा एक भाग आहे. पण एकूणच हा एक अद्भुत प्रवास होता.”
मल्लिका म्हणते की, “मी हरियाणाची आहे. मी ‘मर्डर’ केला जो खूप लोकप्रिय झाला. त्यामुळे जॅकी चॅनने मला त्याच्या चित्रपटात कास्ट केले. मी अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष बराक ओबामा यांना दोनदा भेटले. त्यांनी माझे कौतुक केले. जवळपास दोन दशकांच्या चित्रपटसृष्टीच्या प्रवासात मला मिळालेल्या संधींमुळे मी खूश आहे.”
मल्लिका शेरावतने २००४ मध्ये ‘मर्डर’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. तिने ‘द मिथ’, ‘हिस’, ‘पॉलिटिक्स ऑफ द लव्ह’, ‘टाइम रायडर्स’ असे सिनेमे केले. बऱ्याच काळानंतर मल्लिका रजत कपूर दिग्दर्शित ‘RK/RKAY’ मध्ये गुलाबोच्या भूमिकेत दिसली. या चित्रपटात गुलाबोच्या व्यक्तिरेखेला चांगलीच पसंती मिळाली आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा