‘बिग बॉस’चे चाहते या शोच्या १५व्या सीझनची आतुरतेने वाट पाहत आहेत. चाहत्यांकडून या शोबद्दल वेगवेगळ्या प्रकारचे कयास लावणे सुरूच आहे. या वेळी हा कार्यक्रम ओटीटीवरही टेलिकास्ट करण्यात येणार आहे. पण हे ओटीटी व्हर्जन सलमान खानऐवजी करण जोहर होस्ट करणार आहे. अशा परिस्थितीत, आता या सीझनमध्ये कोणकोणते कलाकार दिसणार आहेत, याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे.
काही काळापूर्वीच निर्मात्यांनी या नवीन सीझनची घोषणा केली आहे. त्यानंतर या शोबद्दल सतत चर्चा सुरू आहे. आता ‘बिग बॉस १५’ मध्ये दिसणार्या कलाकारांची नावे समोर येत आहेत. नेहमीप्रमाणे या वेळीही बरेच टीव्ही स्टार शोमध्ये दिसणार आहेत.
महत्त्वाचे म्हणजे निर्मात्यांनी या शोसाठी बॉलिवूड अभिनेत्री मल्लिका शेरावत हिला आमंत्रण पाठवले होते. पण मिळालेल्या वृत्तानुसार, मल्लिकाने या शोमध्ये भाग घेण्यास स्पष्टपणे नकार दिला आहे.
स्पॉटबॉयच्या वृत्तानुसार, ‘बिग बॉस १५’च्या निर्मात्यांना मल्लिका शोचा भाग व्हावी अशी इच्छा आहे. म्हणूनच तिला त्यासाठी संपर्कही साधण्यात आला. मल्लिका शेरावत स्पर्धक म्हणून या शोमध्ये प्रवेश करणार होती, पण मल्लिकाने आता या शोचा भाग होण्यास नकार दिला आहे. असे म्हटले जात आहे की, ‘मर्डर’ चित्रपटाच्या या अभिनेत्रीने या सीझनमध्ये भाग घेण्यासाठी मोठ्या रकमेची मागणी केली आहे. तसेच अभिनेत्रीला पाहिजे असलेली रक्कम न मिळाल्यामुळे तिने हा शो नाकारला आहे. (mallika sherawat said no to bigg boss 15 is this the reason)
‘बिग बॉस १४’ची विजेती टीव्ही स्टार रुबीना दिलैक झाली होती. शोच्या सुरुवातीपासूनच रुबीना सर्वात शक्तिशाली स्पर्धक मानली जात होती. रुबीना पती अभिनव शुक्लासमवेत शोमध्ये सामील झाली होती. शेवटी, रुबीना राहुल वैद्यला पराभूत करून शोची विजेती ठरली.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-अभिनेता ते साधूपर्यंत किस करण्यामुळे वादात राहिलीय शिल्पा शेट्टी; कोर्टाने जारी केला होता वॉरंट
-गौरीला ‘शक्ती : द पॉवर’मध्ये नव्हती आवडली शाहरुखची ओव्हर ऍक्टिंग; म्हणाली ‘सगळ्यात’ वाईट चित्रपट










