Thursday, January 30, 2025
Home हॉलीवूड ‘या’ मोठ्या अभिनेत्रींच्या ब्रेस्टमध्ये झाली होती टेनिस बॉल एवढी मोठी गाठ, सर्जरी झाल्यानंतर शेअर केला फोटो

‘या’ मोठ्या अभिनेत्रींच्या ब्रेस्टमध्ये झाली होती टेनिस बॉल एवढी मोठी गाठ, सर्जरी झाल्यानंतर शेअर केला फोटो

चित्रपट जगतातील अभिनेत्री आपल्या सौंदर्याची, त्वचेची प्रचंड काळजी घेताना दिसत असतात. सुंदर दिसण्यासाठी तरुण दिसण्यासाठी त्या नानाप्रकारे काळजी घेतात विविध उपाय करताना दिसतात. मात्र काही अभिनेत्री अशाही आहेत ज्या त्यांच्या चेहऱ्यावर असलेल्या खुणा, जखमाही अभिमानाने मिरवत असतात. याबद्दल त्यांना लोक काय म्हणतील, आपल्या करिअरवर काय परिणाम होईल याची त्यांना पर्वा नसते. यामध्ये आता सोशल मीडिया इन्फुंसर आणि लव आर्यंलँड स्पर्धेची उपविजेती मॉली मेई हॅग्युई या अभिनेत्रीचा समावेश आहे. याचा खुलासा तिने आपल्या सोशल मीडिया पोस्टमधून केला आहे.

मॉली मेईही अभिनेत्री आणि मॉडेल म्हणून प्रसिद्ध आहे. आपले अनेक फोटो आणि व्हिडिओ ती सोशल मीडियावर पोस्ट करत असते. नुकताच तिने आपला एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला होता. यामध्ये तिच्या ब्रेस्टवर एक खूण दिसत आहे. हा फोटो तिने तिच्या मॅक्सिकोमधील तिच्या सहलीदरम्यान काढला आहे. या फोटोसोबत तिने “गाठ काढल्यानंतर राहिलेला हा छोटासा डाग” असा कॅप्शन दिला आहे. सध्या तिच्या फोटोची सर्वत्र चर्चा रंगली आहे. तत्पुर्वी काही दिवसापुर्वी मॉलीने तिच्या सर्जरीबद्दल माहिती दिली होती. तिच्या ब्रेस्टमध्ये मोठी गाठ झाल्याचे निदान डॉक्टरांनी केले होते. ही गाठ साधीसुधी नसून गोल्फच्या चेंडूएवढी मोठी झाली होती. याची सर्जरी झाल्याचे रुग्णालयातले फोटोही तिने शेअर केले होते. सोबतच तिला यावेळी झालेला त्रासही तिने सांगितला होता.

याच सर्जरीनंतर तिच्या ब्रेस्टवर एक खूण राहिली आहे, ज्याचा फोटो तिने कसलाही संकोच न करता शेअर केला आहे. सोबतच ही खूण चांगली असल्याचेही तिने म्हटले आहे. मॉलीच्या या फोटोचे सध्या कौतुक होत आहे. या फोटोवर प्रतिक्रिया देणाऱ्या एका चाहत्याने त्यालाही अशा प्रकारची जखम झाल्याचे सांगितले होते, यावर अभिनेत्रीने चिंता व्यक्त करत लवकरात लवकर डॉक्टरांना दाखवण्याचा सल्ला दिला होता.

author avatar
Chinmay Remane

हे देखील वाचा