Monday, October 14, 2024
Home साऊथ सिनेमा प्रसिद्ध अभिनेत्याची तब्येत बिघडली, ईसीएमओ सपोर्टवर उपचार सुरु, तीन वेळा झाली हाेती कोविडची लागण

प्रसिद्ध अभिनेत्याची तब्येत बिघडली, ईसीएमओ सपोर्टवर उपचार सुरु, तीन वेळा झाली हाेती कोविडची लागण

लोकप्रिय मल्याळम अभिनेता इनोसंट वरीद थेक्केथाला याची प्रकृती गंभीर असून त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या अभिनेत्याला ईसीएमओ सपोर्टवर ठेवण्यात आले आहे, ज्याची माहिती रुग्णालयाने शनिवारी जारी केलेल्या निवेदनात दिली. ईसीएमओ म्हणजे एक्स्ट्राकोर्पोरियल मेम्ब्रेन ऑक्सीजनेशन आहे. हे शरीराला ऑक्सिजन देते, ज्यामुळे हृदय आणि फुफ्फुसांना आराम मिळतो.

अभिनेता इनाेसंट वरीद थेक्केथाला (innocent vareed thekkethala) यांना सुमारे दोन आठवड्यांपूर्वी श्वास घेण्यास त्रास होत असल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 75 वर्षीय ज्येष्ठ अभिनेते यांना काही वर्षांपूर्वी कॅन्सर झाल्याचे निदान झाले होते. अशात काही दिवसांपुर्वी नुकतेच ते पडले आणि त्यांची प्रकृती खालावली. गेल्या तीन वर्षांत त्यांना तीन वेळा कोविडची लागण देखील झाली होती, ज्यामुळे त्यांच्या प्रकृतीवर मोठा परिणाम झाला. इनोसंट यांनी अनेक वर्षे मल्याळम मूव्ही आर्टिस्ट असोसिएशन (AMMA) चे अध्यक्ष म्हणून काम केले. या ज्येष्ठ अभिनेत्याने आपल्या चित्रपट कारकिर्दीला निर्माता म्हणून सुरुवात केली.

नंतर ते अभिनयाकडे वळले आणि त्यांनी आपल्या कॉमेडी आणि त्रिशूर स्लँगद्वारे सर्व चित्रपट रसिकांची मने सहज जिंकली. चार दशकांच्या कारकिर्दीत त्यांनी जवळपास 750 चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांची लोकप्रियता इतकी जास्त हाेती की, त्यांना कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया-मार्क्सिस्ट (सीपीआय-एम) ने 2014 च्या लोकसभा निवडणुकीत चालकुडी येथून अपक्ष उमेदवार म्हणून उभे केले हाेते, ज्यावेळी त्यांनी काँग्रेस नेते पी.सी. चाको यांचा पराभव केला.

मात्र, 2019मध्ये त्यांना त्यांची जागा राखता आली नाही. त्यांचा काँग्रेस नेते बेनी बेहानन यांनी पराभव केला. 2020 मध्ये इनोसंट यांना पुन्हा कॅन्सर झाला आणि बरे झाल्यानंतर त्यांनी काही चित्रपटांमध्ये कामही केले. अशात आता इनोसंट यांची तब्येत पुन्हा बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. इनोसंट यांचे चाहते ते लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करत आहेत. (malyalam actor innocent vareed thekkethala put on ventilator support due to health issues)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘मोतीबिंदूचे ऑपरेशन केले’ म्हणत प्रदीप सरकारांच्या अंतिम दर्शनाला आलेल्या दीपिकाला नेटकऱ्यांनी केले ट्रोल

सिद्धार्थने पत्नी कियाराला समर्पित केला बेस्ट स्टाइलचा पुरस्कार, अभिनेत्रीने ‘अशी’ दिली प्रतिक्रिया

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा