Friday, April 26, 2024

‘मोतीबिंदूचे ऑपरेशन केले’ म्हणत प्रदीप सरकारांच्या अंतिम दर्शनाला आलेल्या दीपिकाला नेटकऱ्यांनी केले ट्रोल

नुकतेच बॉलिवूडमधील प्रतिभावान दिग्दर्शक प्रदीप सरकार यांचे दुःखद निधन झाले. परिणिता, मर्दानी आदी अनेक हिट चित्रपटांचे दिग्दर्शन त्यांनी केले होते. आता त्यांच्या निधनानंतर बॉलिवूडमध्ये शोककळा पसरली आहे. इंडस्ट्रीमधील सर्वच कलाकारांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. त्यांच्या शेवटच्या दर्शनासाठी अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. त्यांच्या अंतिम यात्रेत अभिनेत्री दीपिका पदुकोण देखील सामील झाली होती. तिचे अनेक व्हिडिओ देखील व्हायरल झाले आहे. तिच्या या व्हिडिओंवरून तिला आता ट्रोल केले जात आहे.

प्रदीप सरकार यांचे २४ मार्च २०२३ रोजी पहाटे ३.३० रोजी निधन झाले. त्यांनी ‘परिणीता’, हेलीकॉप्टर ईला’, ‘मर्दानी’ आदी पठडीबाहेरील चित्रपटांचे दिग्दर्शन केले होते. त्यांनी अनेक उत्तम सिनेमे बॉलीवूडला दिले. २०१० साली त्यांनी दीपिकाला घेत ‘लफंगे परिंदे’ या सिनेमाचे दिग्दर्शन केले. त्यांच्या अंतिम यात्रेचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, त्यात दीपिकाचा व्हिडिओ देखील आहे. यात तिने पांढरा ड्रेस घातला असून, गॉगल लावला आहे. मात्र यावेळी तिने मीडियासोबत कठपतुली सारखे वर्तन केल्यामुळे तिला आता ट्रोल केले जात आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Manav Manglani (@manav.manglani)

सोशल मीडियावर एका नेटकाऱ्याने लिहिले, “मॅडम श्रद्धांजली देण्यासाठी आल्या आहात ना की इथे देखील शूटिंग करण्याचे ठरवले आहे.” एकाने लिहिले, “खरंच हे लोक असे वागतात की कॉफिनमधून आता थेट जीजस बाहेर येईल.” एकाने लिहिले, “असे वाटते की तिने मोतीबिंदूचे ऑपरेशन केले आहे. म्हणून गॉगल लावला आहे.” यासोबतच ती यावेळी रिहा चक्रवर्तीसोबत हसून चर्चा करताना देखील दिसली होती. दीपिकाचा २०१० साली निल नितीन मुकेशसोबत आलेल्या ‘लफंगे परिंदे’ सिनेमाने सासरी कमाई केली होती.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
संजू बाबाकडे आहे लाखोंची किंमत असणारे लक्झरी घड्याळं कलेक्शन, नजर टाका त्याच्या कलेक्शनवर

दुःखद! ‘या’ टेलिव्हिजन, चित्रपट अभिनेत्रीच्या पतीचे निधन, बाथरूममध्ये आढळले मृत अवस्थेत

हे देखील वाचा