Tuesday, June 24, 2025
Home अन्य महाभारत फेम अभिनेता पुनीत इस्सर यांचे ईमेल आयडी हॅक, तब्बल 13 लाखांना लागला असता चुना

महाभारत फेम अभिनेता पुनीत इस्सर यांचे ईमेल आयडी हॅक, तब्बल 13 लाखांना लागला असता चुना

‘महाभारत’ लोकप्रिय मालिकेतील प्रसिद्ध अभिनेता पुनीत इस्सर यांनी दुर्योधनाची भूमिका साकारली होती. त्या मालिकेमुळे त्यांना घराघरात ओळख मिळाली होती. यांनतर अनेक चित्रपचामध्ये त्यांनी मुख्य भूमिका निभावल्या होत्या. काही दिवसांपूर्वीच अभिनेता रणवीर सिंग याच्या ‘जयेश भाई जोरदार‘ या चित्रपटामध्ये झळकले होते. पुनीत सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. नुकतंच त्यांच्यासोबत एक धक्कादायक घटना घडल्याचे समोर आले आहे.

बॉलिवूड आणि टीव्ही क्षेत्रातील प्रसिद्ध अभिनेता पुनीत इस्सर (Punit Issar) यांच्यासोबत लाखो रुपयाच्या फसवणुकीची घटना घडली आहे. अशातच महाभारत फेम पुनीत इस्सर यांच्यासोबत फसवणूकीची घटना घडली आहे. अभिनेत्याचा ई-मेल आयडी हॅक करुन त्यांच्या बॅंक अकाउंटमधून लाखो रुपये ट्रान्सफर कण्याचा आरोपीचा हेतू होता.

तपासादरम्यान ओशिवरा पोलिस अधिकाऱ्यांनी शनिवर (दि, 26 नोव्हेंबर) रोजी या प्रकरणी आरोपीला अटक केली असून (दि28 नोव्हेंबर) पर्यंत पोलिस कोठडी ची शिक्षा सुनवण्यात आली आहे . आरोपीने तब्बल 13.76 लाख रुपयांची फसवणूक करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र,

झाले असे की, अभिनेता पुनीत यांचा दक्षिण मुंबईमध्ये एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, त्याचदरम्यान पुनीत यांचा ई-मेल हॅक करुन कार्यक्रमाच्या बुकिंद्वारे मिळालेली रक्कम 13.76 लाख रुपये पळवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, मेलवर काही मेसेज आल्यावर अभिनेत्याने फोन ओपन करुन पाहिल्यानंतर त्यांना काही मेल गायब झाल्याचे दिसून आले आणि त्यांनी त्वरितच पोलिसांत तक्रार नोंदवली.

“तपासादरम्यान आम्ही पुनीत इस्सार यांच्या जय श्री राम- रामायन हा कार्यक्रम रद्द झाल्यानंतर एमसीपीएकडे आधी चौकशी केली. त्यांनतर एका बँक अकाऊंटमध्ये 13.76 लाख रुपये ट्रान्सफर केल्याची माहिती मिळवली. त्याच्या आधारे आम्ही उत्तर मुंबईतील मालवणी परिसरातून आरोपीला अटक केली”, अशी माहिती पोलिस अधिकाऱ्यांनी दिली. यापूर्वीही अनेक सालिब्रिटींसोबत ऑनलाईन फसवणूक झाल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. मात्र, अभिनेता या घटनेत थोडक्यात वाचले असून त्यांनी मुंबई पोलिसांचे कौतुक केले आहे, आणि सोशल मीडियावर ट्वीट शेअर करत त्यांना धन्यवाद म्हटले आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
गौतमी पाटीवलविरोधात मनसेची आक्रमक भूमिका, ‘अश्लिल डान्सवरआवर घाला नाही तर..’
दु:खद! ऑस्कर विजेत्या गायिका आणि अभिनेत्रीचे वयाच्या 63 व्या वर्षी निधन

हे देखील वाचा