Tuesday, May 28, 2024

रणवीर सिंगसोबत सेल्फी घेणं पडलं माहागात!, ‘या’ पाक अभिनेत्रीला करावा लागला ट्रोलिंगचा सामना

पाकिस्तानची प्रसिद्ध अभिनेत्री सजल अली पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यावेळी हे प्रकरण भारतीय अभिनेता रणवीर सिंग याच्याशी संबंधित आहे. वास्तविक सजल अलीने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर रणवीर सिंगसोबतचा एक सेल्फी शेअर केला आहे, ज्यावरून पाकिस्तानमध्ये वाद सुरू झाला आहे. एकीकडे काही लोक या फोटोचे कौतुक करत आहेत, तर दुसरीकडे काही लोक तिच्या रणवीरसोबतच्या फोटोवर टीकाही करत आहेत.

सजल अली (Sajal Ali) पाकिस्तानची प्रसिद्ध अभिनेत्री आहे. भारतातील लोकांनाही सजल आवडते. दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी (Shridevi) हिच्या ‘मॉम’ चित्रपटात सजलने श्रीदेवीच्या मुलीची भूमिका साकारली होती. तिने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक फोटो शेअर केला असून, या फोटोमध्ये तिच्यासोबत रणवीर सिंग दिसत आहे. फोटोमध्ये सजलने केशरी आणि गुलाबी रंगाचा सूट घातला आहे. कानात झुमके आणि कपाळावर बिंदी घालून सजल खूपच सुंदर दिसत आहे. तर दुसरीकडे रणवीर सिंगने पिंक कलरचा सूट घातला आहे. एका कार्यक्रमादरम्यान दोघांची भेट झाली.

रणवीरसोबतचा फोटो शेअर करताना सजलने हार्ट इमोजीसह “उफ रणवीर” असे लिहिले. काही तासांतच सजलचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला. यानंतर पाकिस्तानातील अभिनेत्रीचे चाहते या फोटोबाबत दोन गटात विभागले गेले. काही चाहते रणवीरसोबत तिच्या फोटोचं कौतुक करत आहेत, तर काही तिखट प्रतिक्रिया देत आहेत.

sajal ali

एका यूजरने तर लिहिलं की, ‘भारतीयांची अशी स्तुती केली जाते, त्यांच्याकडे खूप पैसा आहे, जर त्यांच्याकडे पैसा असेल तर काहीही होऊ शकत’. तर आणखी एका युजरने म्हटले की, ‘रणवीर ‘उफ्फ’ नाही, तो वेगळा आहे’. रणवीरसोबतच्या सजल अलीच्या या फोटोवर प्रतिक्रिया देताना पाकिस्तानी अभिनेत्री मीनल खान (Meenal Khan) हिने तिच्या डोळ्यात हृदय असलेले दोन इमोजी पोस्ट केले आहेत. याआधी पाकिस्तानी अभिनेत्री शाहरुख खान (Shaharukh khan) याचा मुलगा आर्यन खान (Aryan khan) याची पोस्ट शेअर केल्याने चर्चेत आली होती.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
धक्कादायक! ‘तारक मेहेता का उल्टा चष्मा’ फेम मुनमुन दत्ताचा जर्मनीत अपघात
‘माझा काही भरोसा नाही’, प्राजक्ता माळीने चाहत्याच्या कमेंटवर दिले हटके उत्तर

हे देखील वाचा