Wednesday, July 3, 2024

अजिंक्य राऊतच इंस्टाग्राम अकाउंट झाले हॅक, चाहत्यांमध्ये नाराजीचे वातावरण

मराठी टेलिव्हिजनवर सध्या अनेक मालिका गाजत आहे. त्या मालिका प्रेक्षकांना देखील आवडत आहेत. या सगळ्यात ‘मन उडू उडू झालं‘ (man udu udu zal) ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. अनेकांना या मालिकेचा ट्रॅक आवडत आहे. मालिकेत अजिंक्य राऊत (ajinkya raut) आणि ऋता दुर्गुळे (hruta durgule)मुख्य भूमिकेत आहे. मालिकेत त्यांना खूप प्रेम मिळत आहे.

अजिंक्य सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असतो. त्याचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. परंतु सध्या त्याच इंस्टाग्राम अकाउंट बंद आहे. काही दिवसांपूर्वी त्याचे अकाउंट हॅक झाले. त्यानंतर त्याने त्याचे अकाउंट डिलीट केले. परंतु अजूनही हॅकर कोण होता याची माहिती मिळाली नाही. ज्याने त्याचे अकाउंट हॅक केले होते. त्यानंतर अनेक तपासणी करण्यात आल्या.

अजिंक्यने मन उडू उडू झालं या मालिकेतून टेलिव्हिजनवर पदार्पण केले. त्याच्या एकाच मालिकेने त्याला प्रसिद्धी मिळवून दिली. मालिकेतील त्यांची केमेस्ट्री सगळ्यांना खूप आवडत आहे. अजिंक्यचे अकाउंट बंद असल्याने त्याच्या चाहत्यांमध्ये नाराजी पसरली आहे. काही दिवस अजिंक्य बाबत अपडेट मिळणार नाही म्हणून त्याचे चाहते नाराज आहेत. परंतु लवकरच तो त्याच्याबाबत अपडेट देणार आहे. मालिकेमुळे त्याच्या चाहत्यांच्या संख्येत देखील वाढ झाली आहे.

मालिकेत त्याची इंद्रा नावाची भूमिका सगळ्यांना आवडत आहे. सगळेजण त्याच्या भूमिकेचे कौतुक करत आहे. तसेच तो लवकर चित्रपटात देखील पदार्पण करणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

हे देखील वाचा