Thursday, March 28, 2024

सायकलने आईला धडक बसल्याने अभिनेत्री सिमरन सचदेवने केली ९ वर्षाच्या मुलाविरोधात पोलिसात तक्रार

प्रसिद्ध टिव्ही अभिनेत्री सिमरन सचदेवबद्दल (Simran Sachadeva) एक नवीन बातमी सध्या चांगलीच चर्चेत आली आहे. मुंबईच्या गोरेगावच्या वनराई पोलिसांनी ९ वर्षांच्या मुलाविरुद्ध एफआयआर नोंदवला आहे. विशेष म्हणजे मुलाविरुद्धची ही तक्रार अन्य कोणी नसून टीव्ही अभिनेत्री सिमरन सचदेवाने केली आहे. सिमरनने सांगितले की, मुलाने तिच्या आईला सायकलने धडक दिली, त्यामुळे ती पडली. त्यामुळे अभिनेत्रीवर अपघाताची तक्रार दाखल करण्यात आली आहे. काय आहे हे संपूर्ण प्रकरण चला जाणून घेऊ. 

अभिनेत्री सिमरनने एका अल्पवयीन मुलाविरोधात तक्रार नोंदवली आहे. ज्यामध्ये तिने तिच्या तक्रारीत सांगितले आहे की, हा अपघात 27 मार्च रोजी गोरेगाव पूर्व येथील नेस्कोच्या शेजारी लोढा फिओरेन्झा येथे झाला होता. त्यावेळी तिची 62 वर्षीय आई संध्याकाळी फिरायला गेली होती. यादरम्यान दुचाकीस्वार बालकाची थेट त्यांना धडक बसली आणि त्यामुळे ती खाली पडली. अभिनेत्रीने पुढे सांगितले की, अलीकडेच तिला तिच्या आईचे ऑपरेशन करावे लागले आणि ती आता बरी होत आहे.

त्याचवेळी बालकावर अपघाताचा गुन्हा नोंदवण्याचा अधिकार पोलिसांना नसल्याचे बालकल्याण समितीने म्हटले आहे. यावर अभिनेत्रीने सांगितले की, तिने पोलिसांकडे मुलाच्या पालकांवर कारवाईची मागणी केली. या प्रकरणी एका मुलाखतीत बोलताना अभिनेत्री म्हणाली हो, मी केस दाखल केली होती, पण मुलावर नव्हे तर त्याच्या आई-वडिलांवर गुन्हा दाखल व्हायला हवा होता. असे स्पष्टिकरण दिले आहे.याबद्दल बोलताना सिमरन म्हणाली की, “माझी आई गेल्या 1.5 महिन्यांपासून पूर्णपणे अंथरुणावर आहे. या घटनेनंतर मुलाच्या आईने व्हॉट्सअपवर फक्त सॉरी असा मेसेज केला पण ती कोणतीही जबाबदारी घेण्यास तयार नाही. आईच्या तब्येतीची विचारपूस करण्याची तसदी घेतली नाही. माझ्या आईची तब्येत तपासण्यासाठी ती माझ्या घरीही आली नाही.”

अभिनेत्री पुढे म्हणाली की, “जेव्हा मी तिला विचारले की तिने आपल्या मुलाला अशा ठिकाणी सायकल का चालवायला दिली जिथे सर्व ज्येष्ठ नागरिक चालत होते, तेव्हा त्यांच्याकडे उत्तर नव्हते.” दुसरीकडे, पोलिसांचे म्हणणे आहे की ते लवकरच हे प्रकरण मिटवतील. सिमरन सचदेवा ही एक प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री आहे. सिमरन छोटी सरदारनी, नागिन 3 आणि सुपरकॉप्स Vs सुपरव्हिलेन्स सारख्या टीव्ही मालिकांमध्ये दिसली आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हे देखील वाचा