सध्या छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका ‘मन उडू उडू झालं’चांगलीच गाजताना दिसत आहे. या मालिकेची कथा पहिल्यापासूनच प्रेक्षकांना आवडली होती. आता ही मालिका नव्या वळणावर आली असून मालिकेतील प्रमुख नायिका दिपू रुग्णालयात मृत्युशी झुंज देत आहे. मालिकेत सगळ्यांची मने जिंकणारी, सर्वांच्याच मदतीला येणारी दिपू आज स्वतः मात्र रुग्णालयात आहे. पण या मालिकेच्या प्रेक्षकांसाठी लवकरच आनंदाची बातमी येणार असून रुग्णालयातून दिपू आता लवकरच बरी होऊन घरी परतणार आहे.
‘मन उडू उडू झाल’ मालिकेने प्रेक्षकांची चांगलीच मने जिंकली आहेत. या मालिकेच्या कथेला आणि प्रत्येक कलाकाराला प्रेक्षकांनी नेहमीच भरभरुन प्रतिसाद दिला आहे. त्यामुळेच मालिकेतील प्रत्येक कलाकाराचे प्रेक्षकांशी एक खास नाते तयार झाले आहे. पण काही दिवसांपूर्वीच मालिकेने वेगळे वळण घेतले होते. ज्यामध्ये सानू आणि दिपूच्या वादामुळे दिपूचा अपघात झाल्याचे दाखवले आहे. आ अपघातामुळे गंभीर जखमी झालेली दिपू कोमात गेली होती. तेव्हापासून मालिकेतील प्रेक्षकांनाही तिच्या प्रकृतीची चिंता लागली होती. पण आता लवकरच दिपू बरी होऊन घरी परतणार असल्याची बातमी समोर आली आहे.
दरम्यान या मालिकेत दिपूची भूमिका अभिनेत्री ऋता दुर्गुळे साकारत आहे. नुकताच ऋताचा विवाह सोहळा पार पडला. त्यामुळे ती सध्या परदेशात तिचा हनिमून साजरा करत आहे. यामुळेच या मालिकेत हे नवे वळण दिले गेले होते. मालिकेतील ऋताची भूमिका आणि अभिनय प्रेक्षकांना खूपच आवडत आहे. त्यामुळेच प्रेक्षक आता दिपूला पुन्हा एकदा मालिकेत पाहण्यासाठी उत्सुक झाले आहेत.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा