Saturday, July 6, 2024

शुभमंगल सावधान! मानसी नाईक अडकली विवाहबंधनात, फोटो झाले सोशल मीडिया व्हायरल

मराठी सिनेसृष्टीतील अभिनेत्री मानसी नाईक आज विवाह बंधनात अडकली असून तिच्या लग्नसोहळ्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. आंतरराष्ट्रीय बॉक्सर प्रदीप खरेरासोबत मानसीचे लग्न झाले आहे. कोरोनाच्या नियमांप्रमाणे अगदी मोजक्या लोकांच्या उपस्थित हा लग्न सोहळा संपन्न होत आहे. मानसीच्या लग्नाला तिच्या मैत्रिणी दिपाली सय्यद, रेशम टिपणीस यांनी हजेरी लावली होती.

मानसी नाईकने तिच्या लग्नात हेवी गुलाबी रंगाच्या लेहेंग्याची निवड केली आहे. या गुलाबी रंगाच्या लेहग्यांमध्ये ती खूपच मोहक दिसत आहे. मानसीचा लुक ‘जोधा अकबर’च्या ऐश्वर्या राय-बच्चनच्या लूकची आठवण करून देतो. ऐश्वर्या सारखाच हेवी लेहेंगा, त्यावर हेवी दागिने मानसीने घातले असून मानसीचे गोड हसू तिच्या लूकला पूर्णत्व देत आहे. मानसीच्या या लुकला पाहून तिच्या चाहत्यांसोबत सर्वानीच तिला अनेक कमेंट्स द्यायला सुरुवात केली असून तिच्यावर फॅन्स आणि कलाकारांसोबत सर्वच लोकं शुभेच्छांचा वर्षाव करत आहे.

मागच्या वर्षी कोरोना महामारीमुळे सर्वाना अनेक कलाकारांना त्यांचे लग्न पुढे ढकलावे लागले होते, मात्र आता २०२१ मध्ये भारतातील कोरोना संकट कमी होत असून त्यावर लस देखील आल्याने अनेकांनी त्यांची लगीन घाई सुरू केली आहे. हिंदीसोबतच याला मराठी कलाकार सुद्धा विवाहबंधनात अडकताना ह्यावर्षी दिसत आहेत. २०२१ ची सुरूवात होताच अभिज्ञा भावेने मेहुल पै सोबत लगीनगाठ बांधली.

आशुतोष कुलकर्णी देखील काहीच दिवसांपूर्वी विवाहबंधनात अडकला. आता त्याच्या पाठोपाठ अभिनेत्री मानसी नाईक देखील विवाहबंधनात अडकली आहे. मानसी नाईकचा विवाह बॉक्सर, मॉडेल प्रदीप खरेरा खाच्यासोबत आज १९ जानेवारी रोजी पुण्यामध्ये संपन्न झाला. ही दोघेही अनेक वर्ष रिलेशनशीप मध्ये होते. २०२० मध्ये या दोघांनी खाजगी कार्यक्रमात साखरपुडा केला होता.

मानसीला तिच्या नवीन जीवनासाठी खूप शुभेच्छा.

हे देखील वाचा