सध्या मराठी चित्रपटसृष्टीत आणि राजकारणाच्या मैदानात खळबळ चालली आहे. अभिनेत्री केतकी चितळेने (ketaki chitale) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते शरद पवार यांच्या बाबत आक्षेपाहार्य पोस्ट केल्यामुळे सर्वत्र गोंधळ निर्माण झाला आहे. अनेक राजकीय नेत्यांनी यावर त्यांचे मत मांडले आहे. तसेच केतकीला खडेबोल सुनावले आहे. तरी देखील या संज्ञा गोष्टीचा केतकीवर काहीही परिणाम होताना दिसत नाहीये.
अशातच आता चित्रपटसृष्टीतून देखील तिला विरोध केला जात आहे. अभिनेत्री मानसी नाईकने (manasi naik)केतकीच्या या वागण्यावर तिचे मत मांडले आहे. नुकतेच तिने दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, “जेव्हा मी हे सगळं वाचलं तेव्हा मला खूप वाईट वाटलं, मराठी कलाकारांनी अशा पद्धतीने बोलणे लज्जास्पद आहे. फक्त केतकीचा नाही तर वडील धाऱ्या लोकांबद्दल बोलताना सगळ्यांनी दोनदा विचार करायला हवा. शरद पवार हे केवळ महाराष्ट्रातील, देशातील नाही तर जागतिक पातळीवरील एक मोठे नाव आहे. त्यामुळे त्यांच्याबद्दल बोलताना कोणीही स्वतःची लायकी सोडू नये.”
यानंतर बोलताना ती पुढे ती म्हणाली की, “केतकी चितळेने जे केले ते चुकीचे आहे. या प्रकरणात तिला कठोरातील कठोर शिक्षा व्हायला पाहिजे. जेणेकरून लोकांना समजेल की, आपण कोणाबद्दल असे बोल नये.” अशाप्रकारे तिने तिचे मत मांडले आहे.
केतकी चितळेने एवढं सगळं करूनही तुला कसलाही खेद वाटतं नाही. तिने न्यायालयात कोणताही वकील नेमला नाही. तिने स्वतःची बाजू स्वतः मांडली. तसेच ती ही पोस्ट डिलीट करणार नाही असे देखील सांगितले. यानंतर तिच्यावर अंडेफेक देखील झाली. तरीही तिने हसत हसत या सगळ्याला तोंड दिले.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-
- दुःखद | २१ व्या वर्षी प्लास्टिक सर्जरीदरम्यान चेतना राजचा मृत्यू, कुटुंबीयांनी डॉक्टरांवर केला निष्काळजीपणाचा आरोप
- अंगावर काटा आणणारा ‘सरसेनापती हंबीरराव’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित, प्रवीण तरडेेंच्या लूकने वेधले लक्ष
- नेहा आणि आयशा शर्मा करणार टेलिव्हिजनवर पदार्पण, ‘शायनिंग विथ द शर्मा’मध्ये करणार वैयक्तिक आयुष्याचा खुलासा